Saam Impact : ...अन् नंदुरबारचे प्रशासन खडबडून जागे झाले; 'साम टीव्ही' च्या बातमीची घेतली दखल

आता कामामुळे अपघातांची संख्या कमी हाेईल असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
nandurbar, netrang to shewali highway, road constructions
nandurbar, netrang to shewali highway, road constructionssaam tv

- सागर निकवाडे

Nandurbar News : नेत्रंग -शेवाळी महामार्गाच्या (netrang to shewali highway) दुरावस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे वृत्त साम टीव्हीने (saam tv) प्रसारित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्ती तातडीने हाती घेण्यास हालचाली सुरु केल्या आहेत. (Maharashtra News)

nandurbar, netrang to shewali highway, road constructions
NCP Deputy President Booked For Molesting Women : विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

नेत्रंग - शेवाळी हा महामार्ग नवीन तयार होत आहे परंतु जुना असलेला महामार्ग खड्ड्यांच्या साम्राज्य होऊन मोठ्या प्रमाणावर अपघातांना निमंत्रण देत आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली, जगतापवाडी चौफुली करण चौफुली, सीबी पेट्रोल पंप या परिसरात खड्ड्यांच्या साम्राज्य पसरले आहे.

nandurbar, netrang to shewali highway, road constructions
Cancelled Trains List : महाराष्ट्र एक्सप्रेससह १२ गाड्या रद्द; जाणून घ्या कारण

त्यामुळे अनेकदा तक्रार करून देखील संबंधित प्रशासन लक्ष देत नव्हतं. यासंदर्भात साम टीव्हीने बातमी प्रसारित केल्यानंतर संबंधित प्रशासनाने तात्काळ त्याची दाखल घेतली. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले.

यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी हाेईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. साम टीव्हीमुळे प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी साम टीव्हीचे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com