Cancelled Trains List : महाराष्ट्र एक्सप्रेससह १२ गाड्या रद्द; जाणून घ्या कारण

आजपासून (ता. २९ मार्च) एक एप्रिल या कालावधीत रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.
Amravati Pune Express, Maharashtra Express
Amravati Pune Express, Maharashtra Express saam tv

- अमर घटारे

Amravati Pune Express Latest News : मध्य रेल्वेच्या (Central Railway) भुसावळ विभागातील भुसावळ (bhusawal) ते बादली या दरम्यान चौथ्या लाईनचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा (Indian Railways Department) ३० आणि ३१ मार्च असा २ दिवस ब्लॉक असणार आहे. त्याबाबतची माहिती रेल्वेकडून प्राप्त झाली आहे. (Maharashtra News)

Amravati Pune Express, Maharashtra Express
Saam Impact : आश्रमातून Chulivarcha Baba गायब, दरबार भरलाच नाही (पाहा व्हिडिओ)

परिणामी आजपासून (ता. २९ मार्च) ते एक एप्रिल या कालावधीत मुंबई हावडा महामार्ग मार्गावरील अमरावती पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, अमरावती सुरत एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेससह ३० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा वेग मर्यादित करण्यात आला आहे असे रेल्वेेने कळविले आहे.

Amravati Pune Express, Maharashtra Express
Farmers Andolan At Pune Nashik Highway : तळपत्या उन्हात कांदा उत्पादक शेतक-यांनी पुणे नाशिक महामार्ग राेखला; पाेलिस, प्रशासन हतबल (पाहा व्हिडीओ)

रद्द झालेल्या गाड्या

अमरावती - पुणे एक्स्प्रेस - ३० मार्च

सुरत - अमरावती एक्स्प्रेस - ३० व ३१ मार्च

अमरावती - सुरत एक्स्प्रेस - ३१ मार्च व १ एप्रिल

अहमदाबाद - नागपूर एक्स्प्रेस - ३० मार्च

पुणे - नागपूर एक्स्प्रेस - ३० मार्च

नागपूर - पुणे एक्स्प्रेस - ३१ मार्च

भूसावळ - वर्धा एक्स्प्रेस - ३१ मार्च

वर्धा - भूसावळ एक्स्प्रेस - ३१ मार्च

गोंदिया - कोल्हापूर एक्स्प्रेस - ३१ मार्च

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com