Sangli : देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर टॅक्सी चालक-मालक नाराज, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला माेर्चा

महिलांनी टॅक्सीकडे पाठ फिरवल्यानी टॅक्सी चालक मालकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
Devendra Fadnavis, Sangli, Taxi owners Morcha
Devendra Fadnavis, Sangli, Taxi owners Morchasaam tv
Published On

Sangli News : राज्य सरकारने महिलांना एसटीमध्ये दिलेल्या सवलतीच्या निषेधार्थ,सांगलीत (sangli latest news) टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातल्या टॅक्सी चालकांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे. (Maharashtra News)

Devendra Fadnavis, Sangli, Taxi owners Morcha
Sonalee Gurav Video Viral : मराठामाेळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; तक्रार दाखल

राज्य सरकारने नुकतेच एसटीच्या प्रवासामध्ये महिलांना 50% जाहीर केली आहे..यानंतर सवलतीचा परिणाम प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी सेवेवर झाला आहे. महिलांनी टॅक्सीकडे पाठ फिरवल्यानी टॅक्सी चालक मालकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

Devendra Fadnavis, Sangli, Taxi owners Morcha
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election : भ्याले भ्याले महाडिक भ्याले... सतेज पाटील गटाचे काेल्हापूरात शक्तीप्रदर्शन; न्यायाची अपेक्षा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडाप व्यवसाय बेकायदेशीर असल्याचं विधान केलं आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या माेर्चात टॅक्सीसह सांगली जिल्ह्यातील टॅक्सी चालक-मालक सहभागी झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com