Baramati News : ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत (Gram Panchayat Election Result 2023) झाल्याने काझडमध्ये हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर इंदापूर (Indapur) तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वालचंदनगर पाेलीसांनी दिली. (Maharashtra News)
सोमवारी इंदापूर तालुक्यातील काझड मध्ये काझड-अकोले रोडवर अकोले चौकात ही घटना घडली. या घटनेची माहिती समजताच वालचंदनगर पोलीस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेच्या चौकशी अंती वालचंदनगर पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून हवेत गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन काझड मधील राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.