कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

PMPML Fake App Scam Busted : पुण्यात 20 वर्षीय IT विद्यार्थ्याने कोडिंगच्या मदतीने PMPMLचे बनावट ॲप आणि डेली पास तयार केला. एका कंडक्टरला पासचा रंग आणि स्वरूप वेगळे वाटल्याने त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि बनावट पासचा भांडाफोड झाला.
PMPML Fake App Scam Busted
Fake Pmpml App Created By 20-year-old It Student For Free Bus Travel In Punesaam tv
Published On
Summary
  • पुण्यात 20 वर्षीय IT विद्यार्थ्याने PMPMLच्या अधिकृत ॲपची हुबेहूब बनावट आवृत्ती तयार केल्याचा प्रकार समोर आला.

  • बनावट ॲपच्या माध्यमातून डेली पास तयार करून विद्यार्थ्याने फुकट बसप्रवास केल्याचा आरोप आहे.

  • रूबी हॉल बस स्टॉपजवळ सतर्क कंडक्टरला डेली पासच्या रंग आणि स्वरूपावरून संशय आला.

आयटीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या कोडिंग आणि प्रोग्रामिंग कौशल्य वापर करून पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच PMPML च्या अधिकृत मोबाईल ॲप ची हुबेहूब बनावट वर्जन तयार केलं. या ॲपच्या माध्यमातून त्याने बनावट डेली पास सुद्धा तयार केला आणि गेल्या काही महिन्यांपासून तो विनामूल्य बसप्रवास करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सतर्क कंडक्टरच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला.

PMPML Fake App Scam Busted
Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

पीएमपीएमएलचे सहाय्यक डेपो व्यवस्थापक रामदास दुंडाजी विरणक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यावरून प्रथमेश लक्ष्मण बोगे (वय २०) याच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ३० ऑगस्ट रोजी निदर्शनास आला. सायंकाळी सुमार ५.३० वाजण्याच्या सुमारास भेकाईनगर-आळंदी या बस ने संबंधित विद्यार्थी प्रवास करत होता. रूबी हॉल बस स्टॉप जवळ या बस चे कंडक्टर (वाहक) दत्तात्रय जयभाये यांना संबंधित विद्यार्थ्याने दाखविलेल्या डेली पासमध्ये संशयास्पद बाबी आढळल्या. पासचा रंग आणि स्वरूप संशयास्पद वाटल्याने त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

PMPML Fake App Scam Busted
Pune : पुण्यात भल्यापहाटे वाहतूककोंडीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर ७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी हा एका नामांकित महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत शिक्षण घेत असून स्वतःच्या कोडिंग आणि प्रोग्रामिंगच्या ज्ञानाच्या आधारे हे बनावट अॅप विकसित केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कंडक्टरच्या सतर्कतेमुळे पीएमपीएमएलचे आर्थिक नुकसान टळले तसेच मूळ एप्लिकेश वर याचा कुठला ही परिणाम झालेला नाही अशी माहिती पी एम पी एल प्रशासनाने दिली आहे.

आपली पीएमपीएल ऍप्लिकेशन ला धोका पोहचलेला नाही मात्र पालकांनी दक्षता घेतली पाहिजे, तिकीटीला दिलेले पैसे कुठं वापरतो आहे हे बघितलं पाहिजे. असाच एक प्रकार रामवाडी भागात घडला असून त्यामध्ये सुद्धा विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही असे कृत्य घालणाऱ्या कोणाला ही पाठीशी घालणार नाही असे कृत्य करणाऱ्या लहान असो मोठे त्यांना बोध मिळालाच पाहिजे अशी प्रतिक्रिया पी एम पी एल चे संचालक अजय खेडेकर यांनी दिली आहे.

एआयचा वापर करून बनावट एप्लीकेशन तयार करण्याचे प्रमाण अनेक ठिकाणी वाढले असून यामुळे सायबर गुन्हेगारी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे निश्चितपणे असे कृत्य करणाऱ्या नागरिकांवर विशेषतः अति हुशार विद्यार्थ्यांवर योग्य वेळी चाप लागण्याची गरज आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com