ED Raid
ED Raidx

Mumbai : मुंबईत ईडीची मोठी कारवाई, २ जणांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त, १२ बँक खाती गोठवली

ED Mumbai NDPS case asset seizure details : मुंबईत ईडीची मोठी कारवाई करत एनडीपीएस प्रकरणात सुमारे ६ कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून १२ बँक खाती गोठवली आहेत. मेफेड्रोन ड्रग विक्रीतून झालेल्या मनी लाँडरिंगचा तपास सुरू आहे.
Published on

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

What is PMLA and how ED attaches property : मायानगरी मुंबईमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करत ६ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए २००२ अंतर्गत ईडीने ७ मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्य आहेत. फैसल शेख, अल्फिया शेख व इतरांविरोधात एनडीपीएस प्रकरणात तपास सुरू आहे. मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्रीतून मिळालेला पैसा बँक खात्यांतून फिरवून कायदेशीर दाखवण्याचा आरोप आहे. बनावट कंपन्या व सहकाऱ्यांच्या खात्यांद्वारे पैशांची मनी लाँडरिंग केल्याचा शोध घेतला जातोय. ईडीकडून १२ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई झोनल कार्यालयाने एनडीपीएस प्रकरणात मोठी कारवाई करत सुमारे ५.८८ कोटी रुपये किमतीच्या सात स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. फैसल शेख, अल्फिया शेख आणि इतरांविरुद्ध पीएमएलए २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ED Raid
Housing Society Maintenance : घर तुमचं, पण सोसायटी मेंटेनन्स थकवलाय? 'हा' नवा नियम वाचून तुमची झोप उडेल!

एनसीबी मुंबईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात फैसल शेख हा बंदी असलेल्या मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थाची खरेदी करून त्याचे जाळे तयार केल्याचे उघड झाले. फैसल व त्याची पत्नी अल्फिया शेख यांनी एमडी विक्रीतून मिळालेला पैसा बँक खात्यांद्वारे फिरवून तो कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न केला. यासाठी बनावट कंपन्या व सहकाऱ्यांच्या खात्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

ED Raid
Ajit Pawar Death : अजितदादांच्या अपघातावर नवा सवाल, राष्ट्रवादीचे आमदार नेमकं म्हणाले?

यापूर्वी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी ईडीने छापेमारी करत ४२ लाख रुपये रोख, सुमारे १.७६ कोटींचे १.६ किलो दागिने, ५६ लाख किमतीच्या तीन लक्झरी गाड्या जप्त केल्या तसेच १२ बँक खाती गोठवली होती. या पैशातूनच मालमत्ता खरेदी केल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे.

ED Raid
Accident Video : ऑफिसला जाताना कंटेनर 'यम' बनून आला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा चेंदामेंदा, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com