Rahul Gandhi : ५६ इंचाची छाती, धारावी, अदानी, ईव्हीएम; शिवतिर्थावरून राहुल गांधींची चौफेर फटकेबाजी

Rahul Gandhi Speech In mumbai : राहुल गांधी यांच्या यात्रेचा मुंबईत समारोप झाल्यानंतर मुंबईतील शिवतिर्थावर जंगी सभेचं आयोजन केलं. या सभेत राहुल गांधींनी ५६ इंचाची छाती, धारावी, अदानी, ईव्हीएम अशा सर्वच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam tv
Published On

Rahul Gandhi News :

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरवरून मुंबईला पोहोचली. राहुल गांधी यांच्या या यात्रेचा मुंबईच्या धारावीत समारोप झाला. राहुल गांधी यांच्या यात्रेचा मुंबईत समारोप झाल्यानंतर मुंबईतील शिवतिर्थावर जंगी सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत राहुल गांधींनी ५६ इंचाची छाती, धारावी, अदानी, ईव्हीएम अशा सर्वच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. (Latest marathi News)

राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

१. मणिपूर ते मुंबईची यात्रा केली. देशातील लोकांचं लक्ष वेधण्यासाठी यात्रा केली. या यात्रेत सर्व पक्षातील लोकांनी सहभाग दर्शवला. या यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव आदी नेते सहभागी झाले.

२. आता सोशल मीडियावरही नियंत्रण आहे. लोक विचार करत आहे की, आम्ही सर्व एक राजकीय पक्षाच्या विरोधात लढत आहोत.

Rahul Gandhi
Sharad Pawar Speech : आता ही गॅरंटी दिसणार नाही, कारण...; शरद पवार स्पष्टच बोलले

३. सर्व पक्षातील नेते एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढत आहे.. पण भारतातील युवकांनी समजलं पाहिजे की, आम्ही सर्व लोक एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. आम्ही भाजपच्याही विरोधात लढत नाही. खरंतर एका व्यक्तीला चेहरा बनवून पुढे केलं आहे. आम्ही एका श्क्तीच्या विरोधात लढत आहोत. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. भारताच्या सर्व संस्थेत आहे.

४. एक वरिष्ठ नेते काँग्रेसला सोडून गेले, ते सोनिया गांधींना रडत रडत सांगत होते की, मी या व्यक्तीच्या विरोधात लढू इच्छित नाही. या प्रकारचे हजारो लोकांना घाबरवण्यात आलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोक घाबरून गेले आहेत.

५. मणिपूरहून मुंबईमध्ये आलो. मी यात्रेत काय पाहिलं, हे शब्दात सांगू शकत नाही. एक युवा येतो. माझ्याजवळ आला. त्याला सुरक्षारक्षकांनी मारलं. तरीही तो जवळ आला. त्याने येऊन सांगितलं की, माझ्या मनात देशभक्ती आहे. माझी सीमेवर जाऊन लढण्याची इच्छा होती. पण यांनी अग्नीवीर योजना आणली.

Rahul Gandhi
Elvish Yadav : बिगबॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला पोलिसांकडून अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

६. नरेंद्र मोदी फक्त मुखवटा आहेत. कलाकारांसारखे त्यांना भूमिका दिली आहे. त्यांची ५६ इंचाची छाती नाही. ती पोकळ व्यक्ती आहे. या शक्तीने सीव्हिल वॉरचं युद्ध सुरु केलं आहे.

७. आम्हाला वाटलं, भारताला न्याय द्यायचा असेल तर यात्रा धारावीत संपली पाहिजे. धारावी भारताच्या टॅलेंटचं केंद्र आहे. २२ लोकांकडे जेवढचं धन आहे. तेवढी भारताच्या ७० टक्के लोकांकडं संपत्ती आहे. या देशात ५० टक्के लोकसंख्या ही मागासवर्गीयांची आहे. १५ टक्के दलित , ८ टक्के आदिवासी.. आणि इतर..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com