रुपाली बडवे, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची मुंबईत जंगी सभा होत आहे. या सभेला देशातील विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 'आता ही गॅरंटी दिसणार नाही, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मांडल आहे, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली. (Latest Marathi News)
१. देशाच्या वेगवेगळया भागातून लोक येथे आले आहे. वेगवेगळ्या पक्षाची लोक इथे आले आहेत. तुम्ही इथे देशाचं स्वागत करण्यासाठी आले आहेत.
२. देशात जे आहे त्याला बदलले पाहिजे. देशात ज्या लोकांनी वेगवेगळ्या घोषणा देऊन आपल्याला फसवलं, त्यांना तुम्ही आता मत देऊन बदला.
३. आपल्या सगळ्यांना एकत्र हे बदलावं लागेल.
४. आपण एक खोटी घोषणा ऐकत होतो, की मोदीजींची गॅरंटी, आता ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयागने सर्व मांडलं आहे.
५. या शहरातून गांधींजीनी छोडो देश का नारा दिला होता. आता या देशातून छोडो भाजपचा नारा आम्ही देत आहोत.
१. शरद पवार म्हणाले की, हीच ती मुंबई आहे. महात्मा गांधींनी 42 साली इंग्रजांना चले जाव सांगितलं होतं.
तसंच आपण मुंबईतून या हुकूमशाहीला तडीपार करण्याचं काम करायचं आहे.
२. खरंतर हा फुगा आहे पण, वाईट वाटतं की या फुग्यात हवा भरण्याच काम आम्हीच केलंय. 400 पार म्हणे... काय फर्निचर दुकान आहे? मोदी म्हणाले होते की, ही विरोधी पक्षांची मीटिंग आहे... हो जरूर विरोधी पक्षाची मीटिंग आहे.
३. तुमच्या देशात काय? माझ्या देशाचं नाव बदलायचं आहे का? ते म्हणतात विरोधीपक्ष 29 मध्ये अडकलाय, पण मी 2047 बद्दल बोलतोय. मी म्हणतोय अबकी बार भाजप तडीपार... त्याची सुरुवात आज झाली.
४. शिवतिर्थावरून जेव्हा सुरुवात होते. मुंबईतून एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा ती गोष्ट देशभरात पोहोचते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.