Political News : भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा, पत्रकार आणि नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप

Mumbai Mira Bhynder News : मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत नागरिक आणि पत्रकारांना मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप. भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात भाईंदर पोलिसांत गुन्हा दाखल.
Mira-Bhayandar Municipal Corporation general body meeting clash
Mira-Bhayandar Municipal Corporation general body meeting clashSaam tv
Published On: 
Summary
  • मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान मोठा गोंधळ

  • नागरिक आणि भाजप नगरसेवकांमध्ये वाद

  • घटनेचे व्हिडिओ काढणाऱ्या पत्रकारांनाही मारहाणीचा प्रयत्न

  • या प्रकरणी भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेदरम्यान प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेदरम्यान वादाचे व्हिडिओ काढणाऱ्या पत्रकारांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या काही नागरिकांचा आणि भाजपच्या नगरसेवकांचा वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी नगरसेवकांकडून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ काढण्यासाठी पत्रकार पुढे आले असता, त्यांनाही नगरसेवकांकडून मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Mira-Bhayandar Municipal Corporation general body meeting clash
Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी उपस्थित पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर वाद मिटला. मात्र, या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी काही काळ पत्रकारांनी महानगरपालिकेच्या तळमजल्याजवळ ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनातून पत्रकारांनी घडलेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला.

Mira-Bhayandar Municipal Corporation general body meeting clash
Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

या घटनेमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि संबंधितांची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com