Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Today Weather Update News : भारतीय हवामान विभागाने देशातील १३ राज्यांत पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील हवामानाचा अंदाज जाणून घ्या.
IMD WEATHER ALERT RAIN IN 13 STATES MAHARASHTRA YELLOW ALERT
IMD WEATHER ALERT RAIN IN 13 STATES MAHARASHTRA YELLOW ALERTAI image
Published On: 
Summary
  • १३ राज्यांतील काही भागांत पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

  • उत्तर भारतात पावसाची शक्यता

  • महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट

  • मुंबई-ठाण्यात उकाडा कायम

Monsoon Rain Today Update News देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतरही पावसाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. भारतीय हवामान विभागाने आज देशातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे. उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत १३ राज्यांमध्ये हवामानात बदल होण्याचा अंदाज असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१३ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

हवामानाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांतील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. यासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील काही भागांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

IMD WEATHER ALERT RAIN IN 13 STATES MAHARASHTRA YELLOW ALERT
Ladki Bahin Yojana : पात्र असताना १५०० रुपये बंद, लाडक्या बहिणींचा वर्षावर आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट (Maharashtra Weather Update Today)

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा आणि दमट वातावरणाचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काही भागांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबई, ठाणे आणि रायगड येथे उष्णतेसह दमट हवामान जाणवेल. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, रत्नागिरी, लातूर आणि नांदेड येथेही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. उर्वरित राज्यात उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com