Stray Dog Attack : घराबाहेर खेळताना कुत्र्यांचा हल्ला, १२ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Stray Dog AttackSaam Tv

Stray Dog Attack : घराबाहेर खेळताना कुत्र्यांचा हल्ला, १२ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhivandi Street Dog Attack News : भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. श्वानदंश व अँटी रेबीज लसीच्या उपलब्धतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Published on
Summary
  • भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  • मागील वर्षभरात ११,०३७ कुत्र्यांच्या चावल्याच्या घटना नोंद

  • जानेवारी महिन्यातच १,०६२ जणांना कुत्रा चावल्याची नोंद

  • अँटी रेबीज लस व पालिकेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

फैय्याज शेख, भिवंडी

रागडच्या कर्जतमध्ये एका ९ वर्षाच्या मुलाला कुत्रा चावल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून मागील वर्षभरात ११ हजार ३७ जणांना कुत्रा चावल्याची आकडेवारी आहे. हमीद सद्दाम खान असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

शहरातील ईदगाह या परिसरात घराबाहेर खेळत असताना १० जानेवारी रोजी भटक्या कुत्र्याने हमीद सद्दाम खान यावर हल्ला चढवत त्याच्या चेहऱ्यावर मानेजवळ चावा घेतला होता. त्याच्यावर स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे वेळोवेळी दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने भिवंडी स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात २७ जानेवारी रोजी त्याला पुन्हा दाखल करण्यात आले.

Stray Dog Attack : घराबाहेर खेळताना कुत्र्यांचा हल्ला, १२ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

तेथे उपचार करून श्वानदंशा संदर्भात पुढील उपचारासाठी २७ जानेवारी रोजी कस्तुरबा रुग्णालयात येथे पाठविले.तेथे उपचारा दरम्यान ३१ जानेवारी रोजी हमीद खान हमीदची प्राणज्योत मावळली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.विशेष म्हणजे पालिकेचे १२ वर्षांपासून बंद असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र मागील वर्षी सुरू करण्यात आले आहे.

Stray Dog Attack : घराबाहेर खेळताना कुत्र्यांचा हल्ला, १२ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Union Budget 2026 : शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना

त्यानंतर ही शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत असून जानेवारी या एका महिन्यात १ हजार ६२ जणांना श्वानदंश झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेवर बोलताना आमदार रईस शेख यांनी म्हटले की, भटक्या कुत्र्याच्या दहशतीमुळे मी स्वतः भयभीत असून भिवंडी सारख्या शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशा वरील प्रतिबंधक अँटी रेबीज लस वेळेत न दिल्याने ही समस्या उद्भवल्याने एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला आहे.ही गंभीर बाब असून या जबाबदार असणाऱ्यांवर आपण कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com