Union Budget 2026 : शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना

Nirmala Sitharaman Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात तरुणांसाठी डिजिटल युगात मोठी संधी. शाळा व महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन होणार असून सोशल मीडिया करिअरला चालना मिळणार आहे.
Union Budget 2026 : शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना
Nirmala Sitharaman Union Budget 2026Saam Tv
Published On
Summary
  • केंद्रीय अर्थसंकल्पात तरुणांसाठी डिजिटल करिअरवर भर

  • १५ हजार शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उभारल्या जाणार

  • ५०० आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा

  • IICT मार्फत प्रशिक्षण व देखरेख

  • सोशल मीडिया आता केवळ मनोरंजन नव्हे तर करिअर

केंद्र सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी वर्ग, सर्वसामान्य आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात देशातील तरुणांसाठी डिजीटल युगात रोजगाराच्या नव्या संधी खुल्या केल्या आहेत. येत्या २०३० पर्यंत भारताला सुमारे २० लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची गरज भासणार असल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय ही वाढती संख्या आणि रोजगाराची संधी लक्षात घेता आता शाळा-महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. याद्वारे आता विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांपासूनच कंटेट क्रिएटरचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे.

सोशल मीडिया मुलांसाठी धोकादायक असल्याचे अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत. मात्र आता त्याकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून नाहीतर एक करिअर म्हणून पाहिले जात आहे. यासाठी सरकारने काही ठोस पावलं उचलली आहेत. यानुसार आता देशातील १५ हजार माध्यमिक शाळांमध्ये विशेष कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जाणार आहेत.

Union Budget 2026 : शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना
Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

यामध्ये शाळांशिवाय देशातील ५०० आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. या सर्व प्रयोगशाळांचे काम आणि देखरेख ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) या संस्थेमार्फत केले जाईल. या उपक्रमाला सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Union Budget 2026 : शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना
Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

केवळ रिल्सचे व्हिडिओ बनवणे म्हणजे कंटेंट क्रिएशन नव्हे, तर त्यात स्क्रिप्ट लिहण्यापासून ते अगदी तांत्रिक बाबींचा समावेश असतो. कंटेंट क्रिएटर या लॅब्समध्ये विद्यार्थ्यांना व्हिडिओ एडिटिंग आणि पॉडकास्टिंग, ग्राफिक डिझाइन आणि स्क्रिप्ट लिहिणे, डेटा अ‍ॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग तसेच कॉपीराइट आणि त्यांच्या कायद्यांविषयी देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com