Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

Bengaluru Police Caught Red-Handed in Corruption : बेंगळुरूमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने जामिनासाठी ५ लाख रुपयांची लाच मागून ४ लाख रुपये स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा
Bengaluru Police Caught Red-Handed in CorruptionSaam Tv
Published On
Summary
  • बेंगळुरूमध्ये खाकी वर्दीतील पोलीस अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार उघड

  • जामिनासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

  • लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून ४ लाख घेताना अटक

  • प्रकरणाचा पुढील तपास सुरू

जनतेचं २४ तास रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या जीवावर प्रत्येकजण शांततेत राहतो. आपल्यावर आलेलं प्रत्येक संकट पोलीस प्रशासन निर्भीडपणे दूर करतात आणि गुन्हेगारांना जेलचा रस्ता दाखवतात. मात्र पोलिसांनीच गुन्हा केला तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न नेहमी पडतो. अशीच एक घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. एका खाकी वर्दीतील पोलिसा अधिकाऱ्याने ४ लाख रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या पोलिसाला रंगे हाथ पकडण्यात आले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एका बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा खटला सुरू होता. पोलीस अधिकाऱ्याने त्याला जामीन देण्याची ऑफर दिली होती. तसेच जर त्याने लाच म्हणून ५ लाख रुपये दिले तर,बांधकाम व्यावसायिकावर आणि त्याच्या साथीदारांवर असलेल्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात येणार असल्याचे देखील म्हटले. त्यानुसार २४ जानेवारी रोजी बांधकाम व्यावसायिकाने १ लाख रुपये रोख दिले आणि उर्वरित रक्कम गुरुवारी देण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्याला दिले.

दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचं बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात आल्याने त्याने लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर या घटनेची सत्यता पडताळणीसाठी पोलिसांनी सापळा रचला. सापळा रचल्याप्रमाणे गुरुवारी बांधकाम व्यावसायिकाने आरोपी पोलिसाला उर्वरित पैसे घेण्यासाठी सीएआर मैदानावर भेटण्यास सांगितले. दुपारी ४.३० च्या सुमारास, आरोपी पोलिसांच्या वाहनातून खाकी वर्दीत घटनास्थळी पोचला.

Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा
Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने उर्वरित रक्कम आरोपीच्या हातात दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांची खात्री पटल्याने आरोपी पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडून अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करून पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com