Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर
मेट्रो लाईन ८ ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
CSMIA आणि NMIA दरम्यान थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी
३५ किमी लांबी, २० स्थानकांचा समावेश
भूमिगत आणि एलिव्हेटेड मार्गांचा वापर
प्रवासाचा वेळ व रस्त्यावरील वाहतूक कमी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिेकेला मंजुरी दिली आहे. ही मेट्रो लाईन ८ असणार आहे. ज्याला गोल्डन लाईन म्हणून म्हटले जात आहे. हा महत्त्वाचा कॉरिडॉर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळशी थेट जोडेल, ज्यामुळे दोन्ही विमानतळ दरम्यानचा प्रवास करण्याचा वेळ वाचेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. शिवाय २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली. त्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानचा प्रवासी वेळ कमी करण्यासाठी मेट्रो लाईन ८ या गोल्डन लाईनला मंजुरी मिळाली. या २४ किलोमीटर अंतराच्या मेट्रो.प्रणालीमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मेट्रो लाईन ८ मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून भूमिगत मार्ग ९.२५ किलोमीटर आहे. २४.६३६ किमीचा एलिव्हेटेड मार्ग असून एकूण २० स्थानके, ६ स्थानके भूमिगत, १४ स्थानके उन्नत असणार आहेत. दरम्यान मेट्रो लाईन ८ कॉरिडॉरवरील नियोजित २० स्टेशन्सची नावे समोर आली आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २, फिनिक्स मॉल, एस. जी. बर्वे मार्ग, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस एलटीटी, गरोडिया नगर, बैगनवाडी, मानखुर्द, ISBT, वाशी, सानपाडा, जुईनगर, एल. पी. जंक्शन, नेरुळ स्टेशन, सीवूड्स स्टेशन, अपोलो हॉस्पिटल, सागर संगम, तारघर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पश्चिम आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ अशा २० स्थानकांचा समावेश असणार आहे.
या मेट्रो मार्गामुळे मेट्रो प्रवाशांना पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुरळीतपणे उपलब्ध होईल. तसेच, या इंटरचेंजमुळे पश्चिम आणि मध्य मुंबईतील प्रवाशांना विमानतळावर जाणाऱ्या सेवांमध्ये सहजतेने प्रवेश मिळेल आणि त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतूकही कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
