BH नंबर प्लेटचं जाळं वाढतंय; पण पुण्यात प्रतिसाद कसा आहे? आकडेवारीसह अहवाल समोर

BH Series Vehicle Registration Growth In Pune 2025: पुण्यात BH सिरीज नंबर प्लेटला मोठा प्रतिसाद मिळत असून 2025-26 आर्थिक वर्षात 7,394 वाहनांची नोंदणी झाली आहे. नोकरीतील वारंवार बदली आणि सोपी नोंदणी प्रक्रिया यामुळे या सिरीजची लोकप्रियता वाढत आहे.
BH series number plates gain popularity in Pune as vehicle registrations rise sharply in FY 2025-26.
BH series number plates gain popularity in Pune as vehicle registrations rise sharply in FY 2025-26.Saam Tv
Published On

एक राष्ट्र, एक नंबर या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या भारत सीरीज योजनेला पुणे शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) BH सीरीज अंतर्गत एकूण 7,394 वाहनांची नोंदणी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे.

BH series number plates gain popularity in Pune as vehicle registrations rise sharply in FY 2025-26.
५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

पुण्यात प्रतिसाद वाढण्याचे कारण काय?

पुणे शहरात केंद्र सरकारची कार्यालये, निमसरकारी संस्था आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शाखा आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असतात. याच कारणामुळे पुणे RTO मध्ये BH सीरिज निवडणाऱ्या वाहनधारकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

BH series number plates gain popularity in Pune as vehicle registrations rise sharply in FY 2025-26.
SSC- HSC Result: दहावी- बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? अधिकृत वेबसाइटची यादी वाचा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2021 मध्ये ही मालिका सुरू केली होती. याचा मुख्य उद्देश एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झाल्यावर वाहनाचे रजिस्ट्रेशन पुन्हा करण्याची कटकट दूर करणे हा आहे. सर्वसाधारण नियमानुसार दुसऱ्या राज्यातील वाहन कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त 12 महीने चालवता येते. त्यानंतर त्या राज्यात नवीन नोंदणी करणे बंधनकारक असते.जर वाहनाकडे BH सिरिज असेल तर राज्यानुसार नोंदणी बदलण्याची गरज उरत नाही. वाहन मालक देशभरात कुठेही कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकतात.

BH series number plates gain popularity in Pune as vehicle registrations rise sharply in FY 2025-26.
Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

नंबर प्लेटचे स्वरूप कसे असते?

'BH सीरीज'च्या नंबर प्लेटची रचना विशिष्ट असते. यात सर्वात आधी नोंदणीच्या वर्षाचे शेवटचे दोन अंक असतात, त्यानंतर 'BH' हा कोड असतो, मग चार अंकी वाहन क्रमांक आणि शेवटी 'A' ते 'Z' यांपैकी अक्षरे असतात. संपूर्ण देशात विनाअडथळा वाहन वापरण्याच्या सुविधेमुळे पुण्यातील नोकरीपेशा वर्गात या सीरीजची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com