५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

Mumbai ANC MDMA Drug Bust Full Details: मुंबईत एएनसीची मोठी कारवाई करत ५ कोटींच्या एमडीएमए (एक्स्टेसी) गोळ्या जप्त करण्यात आल्या. टिटवाळ्यातील महिला मुख्य सप्लायरला अटक करण्यात आली असून ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे.
Mumbai ANC officials display seized MDMA pills worth ₹5 crore after arresting a key woman supplier in a major drug bust.
Mumbai ANC officials display seized MDMA pills worth ₹5 crore after arresting a key woman supplier in a major drug bust.AI
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई शहरातील ड्रग्सविरोधी मोहिमेत एंटी नारकोटिक्स सेल (ANC) ने मोठे यश मिळवत एक्स्टेसी (MDMA) गोळ्यांची मोठी खेप जप्त केली आहे. घाटकोपर युनिटने केलेल्या या कारवाईत टिटवाळा (कल्याण) येथील 36 वर्षीय महिला आरोपीला अटक करण्यात आली असून ती या रॅकेटची मुख्य सप्लायर असल्याचे समोर आले आहे.

Mumbai ANC officials display seized MDMA pills worth ₹5 crore after arresting a key woman supplier in a major drug bust.
SSC- HSC Result: दहावी- बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा? अधिकृत वेबसाइटची यादी वाचा

साकीनाका पोलीस ठाण्यात CR नंबर 45/26 अंतर्गत NDPS कायद्याच्या कलम 8(C), 22(C) आणि 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ANC ने आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत 4056 एक्स्टेसी गोळ्या (एकूण वजन 2030 ग्रॅम) जप्त करण्यात आल्या असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 5.07 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

Mumbai ANC officials display seized MDMA pills worth ₹5 crore after arresting a key woman supplier in a major drug bust.
Pune Crime: पुणे हादरले! समलिंगी संबंधाला विरोध केला, १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

यापूर्वीही मुख्य आरोपीकडून 104 ग्रॅम MDMA जप्त करण्यात आले होते, ज्याची किंमत सुमारे 26 लाख रुपये होती. 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5 वाजता ही अटक करण्यात आली. या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्स नेटवर्कला मोठा धक्का बसला असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com