Pune Airport: मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात,धावपट्टी तात्पुरती बंद

Pune Airport News: पुणे विमानतळासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अपघातामुळे खराब झालेले रनवे दुरुस्त करण्यात आले आहे.
Pune Airport: मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात,धावपट्टी तात्पुरती बंद
Published On

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे विमानतळाची धावपट्टी पुढील काही तासांसाठी बंद करण्यात आली आहे. या अपघातात विमान कर्मचारी सुरक्षित आहेत. कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. परंतु धावपट्टी मोकळी करून सामान्य विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सध्या दुरुस्तीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. विमानसेवा पुन्हा सुरू होण्यास अंदाजे पाच तास लागतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

Pune Airport: मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात,धावपट्टी तात्पुरती बंद
गुड न्यूज! ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो कधी सुरू होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

भारतीय हवाई दलाने शुक्रवारी रात्री उशिरा सांगितले की, त्यांच्या एका विमानाचा अपघात झाला आहे. पुणे विमानतळावरील धावपट्टी तात्पुरती अनुपलब्ध आहे. धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. "आयएएफच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे धावपट्टी तात्पुरती अनुपलब्ध आहे. विमान कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही नागरी मालमत्ता खराब झालेली नाही," असे आयएएफने सोशल मीडियावर म्हटलंय.

Pune Airport: मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात,धावपट्टी तात्पुरती बंद
Pune Airport News : आनंदाची बातमी! पुण्यातून विमानाने काही तासांत अबू धाबीला जाता येणार, जाणून घ्या वेळापत्रक

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आले असून, धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे ५ तासांचा कालावधी लागू शकतो.

परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ,केंद्रीय राज्यमंत्री यांनी या घटनेप्रकरणी दिली आहे. दरम्यान, रनवे दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सकाळी ७ः३० पासून विमाने उडण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे. तर ८ वाजल्यापासून विमाने उतरण्यास सुरुवात होईल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेवरून वेगाने काम पूर्ण करण्यात आले आहे. आज दिवसभरात पुण्याची हवाई वाहतूक पूर्ववत होणार अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com