Pune Airport News : आनंदाची बातमी! पुण्यातून विमानाने काही तासांत अबू धाबीला जाता येणार, जाणून घ्या वेळापत्रक
Pune newsSaam tv

Pune Airport News : आनंदाची बातमी! पुण्यातून विमानाने काही तासांत अबू धाबीला जाता येणार, जाणून घ्या वेळापत्रक

Pune news : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! एअर इंडिया एक्सप्रेसकडून २ डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. आठवड्यात तीन उड्डाणे असणार असून, या सेवेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.
Published on
Summary

२ डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी थेट विमानसेवा सुरू होणार

एअर इंडिया एक्सप्रेसकडून आठवड्यात तीन उड्डाणे

पुणेकरांना मुंबई, दिल्ली मार्गे जाण्याची गरज नाही

पर्यटन आणि व्यावसायिक संपर्कांना चालना मिळणार

पुण्यातून अबू धाबीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीने शनिवारी याबाबत घोषणा केली. पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबू धाबी विमान उड्डाण होणार आहे.

पुण्यातून रात्री ८.५० वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि अबू धाबी येथे रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात, विमान रात्री ११.४५ वाजता अबू धाबीहून निघेल आणि पहाटे ४.१५ वाजता पुण्यात उतरेल, असे एअर इंडियाने एक्सप्रेस कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. सध्या पुणे विमानतळावरून दुबई, बँकाॅक आणि सिंगापूर या तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी नियमित उड्डाणसेवा सुरू आहे. हवाई प्रवाशांची युरोप, यूएई यांसारख्या देशांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

Pune Airport News : आनंदाची बातमी! पुण्यातून विमानाने काही तासांत अबू धाबीला जाता येणार, जाणून घ्या वेळापत्रक
EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

उद्योजकांकडून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचा विस्तार करण्यासाठी ही मागणी करण्यात येत होती. त्यानुसार विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण सुरू आहे. टप्प्याटप्प्याने विमानांची उड्डाणे वाढविण्यात येत आहेत. त्यानुसार एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने सिंगापूर, बँकाॅक हवाई सेवेनंतर आता अबू धाबी येथे विमानसेवेची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

Pune Airport News : आनंदाची बातमी! पुण्यातून विमानाने काही तासांत अबू धाबीला जाता येणार, जाणून घ्या वेळापत्रक
Fake Currency Scam : धक्कदायक! पैसे दुप्पट करून देतो सांगायचा, खऱ्या पैशांऐवजी द्यायचा खेळण्यातील नोटा, नेमकं प्रकरण काय?

आतापर्यंत पुणे ते अबू धाबी विमानसेवा नसल्याने प्रवाशांना मुंबई, दिल्ली या विमानतळांवरून जावं लागतं होतं. आता थेट सेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. त्याचबरोबर या सेवेमुळे पर्यटनाला चालना मिळेल. पुणे-सिंगापूर विमानसेवेमुळे पूर्वेकडील देशांशी पुण्याचे संबंध मजबूत झाले आहेत. तसेच पुणे ते अबू धाबी सेवेमुळे पश्चिम देशांचा संपर्क सुलभ होईल. तसेच पुणे ते अबू धाबी विमानसेवेमुळे मध्य पूर्वेतून आणि युरोपमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com