Badlapur : बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी मोठी अपडेट; IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई होणार

Badlapur Woman Egg Trafficking Case Update : बदलापूरमध्ये गरिब महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्त्रीबीज तस्करी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पाच आरोपी अटकेत असून महिला आयोगाने IVF व सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Badlapur : बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी मोठी अपडेट; IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई होणार
Badlapur Woman Egg Trafficking Case UpdateSaam Tv
Published On
Summary
  • बदलापूरमध्ये स्त्रीबीज तस्करीचे रॅकेट उघड

  • पैशांचे आमिष देऊन गरिब महिलांची फसवणूक

  • पाच आरोपी अटकेत; राज्यभर जाळे पसरल्याचा संशय

  • महिला आयोग व पोलिसांकडून कठोर कारवाईची तयारी

मयुरेश कडव, बदलापूर

बदलापूरमध्ये २१ फेब्रुवारी रोजी गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या स्त्री बीजाची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आला. याप्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची दखल घेण्यासाठी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बदलापूर येथे भेट देऊन IVF सेंटरवर तसच सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई होईल असे सांगितले आहे.

रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात सहभाग असलेल्या IVF सेंटरवर तसच सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात नाशिकमधील मालती IVF सेंटर ठाण्यात सुरू होतं, त्या सेंटरच्या माध्यमातून हे कृत्य सुरू असल्यासही त्यांनी सांगितल आहे. स्त्री बीज तस्करी प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Badlapur : बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी मोठी अपडेट; IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई होणार
Malad Fruit Seller : फळांना लावलं जातंय उंदीर मारण्याचं औषध, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; संतापजनक Video व्हायरल

या पाचही जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःची ओळख लपवून स्त्रीबीजांची तस्करी केल्याचं समोर आल आहे. तसेच हे रॅकेट बदलापूर ठाण्यापुरता मर्यादित नसून याची पाळामुळे संपूर्ण राज्यात तसच राज्याबाहेरही पसरल्याचं रूपाली चाकणकर यांनी सांगितल. बदलापूर पोलिसांनी हे प्रकरण शोधून काढल्याबद्दल त्यांनी पोलिसांचही यावेळेस कौतुक केलं. दरम्यान आता याप्रकरणात कोणते नवे मासे गळाला लागणार आणि कोणतं नवं वळण या प्रकरणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Badlapur : बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी मोठी अपडेट; IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाई होणार
Kalyan Dombivli : केडीएमसीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत;महापौर, उपमहापौर बिनविरोध, तरीही महासभा का नाही? कुणाचा दबाव?

नेमका काय आहे हा प्रकार?

बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं. आणि त्याची विक्री हजारो रुपयांना केले जायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com