धावपटूचा पाण्यात बुडून मृत्यू; सरावानंतर पोहण्यासाठी गेला अन् काळाचा घाला, क्रीडाक्षेत्रात शोककळा

Ambernath Runner Sagar Saroj Dies: अंबरनाथचा धावपटू सागर सरोज याचा बदलापूरमधील कोंडेश्वर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. धावण्याचा सराव पूर्ण केल्यानंतर पोहण्यासाठी गेलेल्या सागरच्या निधनाने कुटुंबीयांसह रनहोलिक्स अकॅडमी आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Ambernath Athlete Sagar Saroj Drowns
Ambernath Athlete Sagar Saroj Drownssaam tv
Published On: 

अजय दुधाणे, साम टीव्ही

अंबरनाथ येथील शिवमंदिर परिसरात राहणाऱ्या धावपटू सागर सरोज याचा बदलापूरमधील कोंडेश्वर येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी धावण्याचा सराव पूर्ण केल्यानंतर तो पोहण्यासाठी कोंडेश्वर येथे गेला होता. मात्र, याच ठिकाणी काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेमुळे सागरच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, क्रीडा क्षेत्रासह रनहोलिक्स अकॅडमीमध्ये शोककळा पसरली आहे.

Ambernath Athlete Sagar Saroj Drowns
Pune : पुणे पोलिसांची धडक कारवाई! १९ विदेशी महिलांना घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

सागर सरोज शनिवारी सकाळी अंबरनाथ येथील कमलधाम आश्रमाजवळील रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. सराव पूर्ण झाल्यानंतर घरी परतण्याऐवजी तो बदलापूर येथील कोंडेश्वर परिसरात पोहण्यासाठी गेला. मात्र, पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Ambernath Athlete Sagar Saroj Drowns
Ambernath News : ऑनलाइन ऑर्डर कॅन्सल केली, डिलिव्हरी बॉयनं तिघांना बेदम मारलं; घटना सीसीटीव्हीत कैद

सागरच्या अकाली निधनाने त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि रनहोलिक्स अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनामुळे संपूर्ण अकॅडमीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर रनहोलिक्स अकॅडमीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सराव पूर्ण झाल्यानंतर थेट घरी जावे, धोकादायक ठिकाणी जाणे किंवा पोहणे टाळावे, तसेच स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ambernath Athlete Sagar Saroj Drowns
Mumbai : मुंबईत उघड्यावर शेकोटी पेटवणे महागात पडणार! इतक्या रुपयांचा आकारणार दंड; प्रशासनाचा निर्णय

आपले आयुष्य केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबीयांसाठीही अनमोल आहे. त्यामुळे कोणताही धोका पत्करू नये आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.