अजय दुधाने, अंबरनाथ
लक्ष्मीपूजना दिवशी आलेल्या पार्सलची ऑर्डर कॅन्सल केल्याने एका डिलेवरी बॉयने वृद्ध दांपत्याला मारहाण केली. हा डिलिव्हरी बॉय एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने दुसऱ्या दिवशी मध्यस्थी करण्यास आलेल्या तरुणाला बोलावून बेदम मारहाण केली. ही घटना अंबरनाथ पूर्व बी केबिन रोडवर असलेल्या शारदा अपार्टमेंट मध्ये घडली आहे. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
वसंत साळुंखे यांच्या मुलाने एका ई-कॉमर्स साइटवरून साहित्याचे पार्सल मागवले होते. मात्र लक्ष्मीपूजन सुरू असतानाच कुरियर बॉय पार्सल घेऊन घरी पोहोचला. त्यामुळे साळुंखे यांनी सदरील पार्सल दुसऱ्या दिवशी आणण्यास किंवा ऑर्डर रद्द करण्यास डिलिव्हरी बॉयला सांगितले. परंतु डिलिव्हरी बॉयचा संताप अनावर झाला आणि त्याने अपमानास्पद भाषा वापरत साळुंखे यांना शिवीगाळ केली. केवळ यावर न थांबता डिलिव्हरी बॉयने वृद्ध साळुंखे दांपत्याला मारहाण केली. सदरील प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आणि घटनेत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.
मात्र डिलिव्हरी बॉय यावरच न थांबता त्याने मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला दुसऱ्या दिवशी बोलावत बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या डोळ्याला आणि गालावर गंभीर दुखापत झाली.
डिलिव्हरी बॉयने आपल्या साथीदारांसह सदरील तरुणावर हा हल्ला केल्याने त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी साळुंखे कुटुंबाने केलीय. दरम्यान एका किरकोळ कारणावरून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जातो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.