Pune : पुणे पोलिसांची धडक कारवाई! १९ विदेशी महिलांना घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

Pune News : पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या १९ विदेशी महिला आढळल्या. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने तपासणी मोहीम राबवून कारवाई सुरू केली आहे.
Pune Police news
Pune Police news AI Image
Published On: 

पुणे शहरात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १९ विदेशी महिलांचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने या महिलांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. तसेच त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विविध देशांतील नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी भारतात येतात. भारतात येण्यासाठी त्यांना ठरावीक कालावधीचा व्हिसा दिला जातो. मात्र, काही विदेशी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारत सोडत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. अशा नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष शाखेला दिले होते.

Pune Police news
Transfer News : पोलीस दलात मोठे फेरबदल! तब्बल २७३ DSP आणि एका IPS अधिकाऱ्याची बदली, कुणाची कुठे झाली नियुक्ती

या आदेशानंतर पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २० नोव्हेंबर रोजी कोरेगाव पार्क, मांजरी आणि मुंढवा या भागांत तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी जाऊन विदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी १९ विदेशी महिला व्हिसाची मुदत संपल्यानंतरही पुण्यात राहत असल्याचे आढळून आले.

Pune Police news
Bank Closed : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची यादी

या महिलांनी व्हिसासंदर्भातील नियमांचे पालन केले नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्यांना भारताबाहेर पाठवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरात विदेशी नागरिकांच्या वास्तव्यावर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा पुढेही राबवल्या जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.