Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Sunetra Pawar On Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल केला. यावर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
Ajit Pawar Death CaseSaam Tv
Published On
  • अजित पवार विमान अपघातावर सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान

  • अद्याप गुन्हा दाखल का केली नाही? असा सुप्रिया सुळे यांचा सवाल

  • सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

  • अजित पवार यांच्या अपघाताचं राजकारण करू नका असे सुनेत्रा पवार म्हणाल्या

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्य सरकारला धारेवर धरले. अमित ठाकरे यांच्यावर तासाभरात गुन्हा दाखल होतो मग अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. याच मुद्द्यावर बोलताना राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

सुनेत्रा पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती आहे? हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार. अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका. आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे. त्यांना ही आपण वेळ दिला पाहिजे.'

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत सांगितले की, 'अजितदादांची आई, दादांची मुलं आणि मी याच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला कळणार? पंतप्रधान मोदी , अमित सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही सभागृहात सांगितले आहे त्यांना ही आम्ही भेटलो आहे. सगळ्यांनाच वाटत आहे की काही तरी निर्णय आम्हाला पाहिजे आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत शकतो. दादांच्या जाण्याचं राजकारण कुणीच करू नये असे मला वाटते. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का? असे मला वाटते. सतत मीडियामध्ये म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही. लवकरात लवकर चौकशी व्हावी असे आम्हाला ही वाटते आम्ही तसे प्रयत्न करतो आहे.'

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com