राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Ncp Ajit Pawar Faction District Chief 20 Workers Detained Raigad Khalapur: रायगडच्या खालापूरमध्ये नियोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनापूर्वी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह सुमारे 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
NCP Leader Sudhakar Ghare Detained With 20 Workers In Raigad Khalapur
NCP Leader Sudhakar Ghare Detained With 20 Workers In Raigad Khalapursaam tv
Published On

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या खालापूरमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. आंदोलनाच्या एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह सुमारे 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. गोदरेज आणि टाटा कंपनीविरोधात स्थानिकांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरुवारी खालापूर येथे आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर पोलिसांनी कंपनी प्रशासनासोबत बैठक आयोजित केली.

NCP Leader Sudhakar Ghare Detained With 20 Workers In Raigad Khalapur
shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरूवात

या बैठकीसाठी सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांनी घारे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे. स्थानिकांच्या प्रश्नांवरून होणाऱ्या आंदोलनापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेचे पडसाद रायगडच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.

NCP Leader Sudhakar Ghare Detained With 20 Workers In Raigad Khalapur
Shivsena Vs NCP: सरोगसी बाळ ते अकलेचे तारे...शिंदेसेना-राष्ट्रवादी वाद उफाळला; रायगडच्या राजकारणाला पुन्हा फोडणी

खालापूरमधील या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. उद्याच्या नियोजित आंदोलनाबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे नेते आणि महिला पदाधिकारी जमा झाले होते. जोरदार घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होती.

NCP Leader Sudhakar Ghare Detained With 20 Workers In Raigad Khalapur
सुनील तटकरे यांचं राष्ट्रवादीतील स्थान डळमळीत झालंय; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दरम्यान आता मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांना घेतले खालापूर येथून ताब्यात उद्या सकाळी खालापूर तालुक्यातील गोदरेज आणि टाटा स्टील या कंपनीवर महा एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पब्लिक जमा होईल.आणि काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करत सुधाकर घारे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांना अलीबागच्या दिशेने घेऊन गेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com