अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Ajit Pawar Accident Investigation Latest Update 2026: अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ब्लॅक बॉक्समधील सर्व डेटा डाउनलोड झाला असून तपास जलदगतीने सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येईल अशी माहिती दिली.
Officials analyze black box data in Ajit Pawar accident case as investigation intensifies
Officials analyze black box data in Ajit Pawar accident case as investigation intensifiessaam tv
Published On

पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत माहिती दिली. या प्रकरणाचा तपास दोन प्रकारे सुरू आहे. एक तपास सीबीआय (CBI) करते आहे तर दूसरा तपास एआयबी (AIB) करते आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा तपास अजून सीबीआय करत नाहीये, त्याचे कारण म्हणजे जो पर्यंत एआयबीचा रिपोर्ट येत नाही तो पर्यंत सीबीआय तपास करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्याची आपण वाट पाहतो आहे, असे फडणवीस म्हणाले

पुढे ते म्हणाले, सीआयडी तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये एक शंका पायलट सुमित कपूर यांच्यावर देखील होती. त्यांचे बँक खाते, इन्शुरन्स पॉलिसी आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक याचा सगळा तपास झाला असून त्यात कुठेलही संशयास्पदबाबी आढळल्या नाही. बाकी जेवढे सगळे फुटेज मिळवले आहे. त्याचे विश्लेषण केले आहे.

तसेच या तपासात अमेरिकेची एजन्सी आणि परदेशातील काही तज्ञ काम करत असून ब्लॅक बॉक्समधील सर्व डेटा हा शंभर टक्के डाउनलोड झाला असून त्यांनी प्राथमिक अहवाल आपल्याकडे दिला आहे. यासर्व प्रकरणावर मी केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आहे. तसेच या सर्व तपासाला जवळपास 3 ते 4 वर्षांचा कालावधी जातो. मात्र केंद्र सरकारने सीबीआयला हा तपास जलदगतीने करण्यास सांगितले असल्याने अजित पवारांच्या पुण्यतिथिआधीच सर्व तपास पूर्ण होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com