Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलमध्ये बदल होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Petrol Diesel Price Update: केंद्र सरकार इंधन क्षेत्रात लवकरच मोठे बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार पेट्रोलमध्ये ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित करण्यासाठी नवीन मानक जाहीर करण्याच्या तयारीत आहे.

देशातील पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने इंधन क्षेत्रात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारने आता पेट्रोलमध्ये ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित करण्यासाठी नवीन इंधन मानक (Standards) अधिकृतपणे जारी केले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी E22, E25, E27 आणि E30 हे नवीन इंधन मिश्रण मानक अधिकृतपणे जारी केले आहेत. नवीन मानकांमुळे आता पेट्रोलमध्ये ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच भारतीय रस्त्यांवर या इंधनावर धावणाऱ्या गाड्या दिसतील.या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील परकीय अवलंबित्व कमी होईल आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला लगाम बसण्यास मोठी मदत होईल.सध्या देशभरात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट गाठण्यासाठी वेगाने काम सुरू असून, नवीन मानकांमुळे पर्यायी इंधनाला मोठी चालना मिळणार आहे.नवीन इंधन मानकांनुसार वाहन उत्पादकांना गाड्यांच्या इंजिनमध्येही आवश्यक तांत्रिक बदल करावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com