Shocking News : 'एम्स'मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने पुण्यात आयुष्य संपवलं, धक्कादायक कारण, व्हॉट्सअॅपवर नोट टाकली अन्...

pune aiims student News : 'एम्स'मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. सुरीने गळा चिरुन आयुष्य संपवलं.
pune News
pune aiims student NewsSaam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

अभ्यासाच्या तणावाला कंटाळून एम्स रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःचा गळा कापत पुण्यात आत्महत्या केलीय. भोपाळ येथील एम्स रुग्णालयात शिकत असलेल्या तरुणाने पुण्यातील वानवडी परिसरात स्वतःच जीवन संपवलं. उत्कर्ष महादेव हिंगणे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळ बीडचा होता.

pune News
Famous Actress : कहर! २५ वर्षीय अभिनेत्री कपड्याविना अभिनेत्यासोबत बाथटबमध्ये; इंटरनेटवर खळबळ

पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणे हा मूळ बीड जिल्ह्याचा होता. भोपाळ येथील एम्स रुग्णालयात तो प्रथम वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत होता. पुण्यात सुरू असलेल्या एम्स महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शिंगणे पुण्यात आला होता.

आज सकाळी १०.१५ वाजता पंचरत्न हौसिंग सोसायटी, फातिमा नगर वानवडी येथे एक तरुणाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळल्याचा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता उत्कर्षने तो सध्या राहत असलेल्या एएफएमसीच्या वसतीगृहातील एका खोलीतील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळला.

pune News
Operation Sindoor : १०० दहशतवाद्यांचा खात्मा, ९ दहशतवादी तळांवर हल्ला, कसाबचं ट्रेनिंग कॅम्प उद्धवस्त; सैन्य दलाकडून A टू Z माहिती, वाचा

उत्कर्षने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सॲपवर नोट लिहिली आणि त्यामध्ये आत्महत्येचे कारण लिहिले. या नोटमध्ये बदलता अभ्यासक्रम, वर्गातील उपस्थिती (अटेंडन्स), शैक्षणिक तणाव असे कारण देत माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नका, असं सुद्धा स्पष्ट केलं आहे. तसेच या हत्याराने त्याने स्वतःचा गळा चिरला. ते हत्यार उत्कर्षने ऑनलाईन मागवलं होतं, असं देखील तपसात समोर आलं आहे.

pune News
india pakistan conflict : पाकिस्तानात सत्तापालट होणार? ट्रम्प यांची मध्यस्थी, पाकने धुडकावली, वाचा स्पेशल रिपोर्ट

उत्कर्ष शिंगणे याला नीट परीक्षेत ७२० पैकी ७१० मार्क मिळाले होते. उत्कर्ष याचे वडील डॉक्टर असून भाऊ सुद्धा वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात आहे. तर आई गृहिणी आहे. भोपाळमध्ये शिक्षण घेत असलेला उत्कर्ष हा गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com