Famous Actress : कहर! २५ वर्षीय अभिनेत्री कपड्याविना अभिनेत्यासोबत बाथटबमध्ये; इंटरनेटवर खळबळ

Famous Actress kayadu lohar : २५ वर्षीय अभिनेत्री कयादू लोहारचा कपड्याविना अभिनेत्यासोबतचा बाथटबमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे खळबळ उडाली आहे.
kayadu lohar
Famous Actress Saam tv
Published On

सिनेसृष्टीत कोणाचं आयुष्य कधी बदलेल, हे कोणीच सांगू शकत नाही. काही लोकांनी कितीही मेहनत केली, तरी त्यांना लोकांमध्ये चांगली ओळख मिळत नाही. तर काही जण रातोरात स्टार होतात. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अशीच एक अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. कयादू लोहार असं अभिनेत्रीचं नाव आहे.

kayadu lohar
Pune Loksabha News : '...अन्यथा शिक्षा व्हायला हवी'; मतदान न करणाऱ्यांवर सुबोध भावे भडकला

कयादू लोहारने तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अभिनेत्री कयादूचे फार चित्रपट नाहीत. तरीही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री कयादूने तिच्या सौंदर्याने तरुणांचं हृदय जिंकलं आहे. तरुणांना प्रेमात पाडणाऱ्या कयादू लोहारचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. कयादूने एका सिनेमात अभिनेता जीवी प्रकाशसोबत बाथटबमध्ये कपड्याविना फोटोशूट केलं आहे.

'इमॉर्टल' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जीवी प्रकाशसोबत कयादूच्या 'इमॉर्टल' सिनेमाचा पोस्टर लाँच रिलीज झालं आहे.या पोस्टरमध्ये कयादू बाथटबमध्ये अभिनेत्यासोबत दिसत आहे. तिच्या एका हातात दारूचा ग्लास असल्याचे दिसत आहे. पोस्टर बघितल्यानंतर कयादूच्या चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे.

kayadu lohar
Bob Cowper Death : क्रीडाविश्वावर शोककळा, दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, टेस्टमध्ये ठोकलं होतं त्रिशतक

कयादू लोहारचा जन्म आसामच्या तेजपूरमध्ये ११ एप्रिल २००० रोजी झाला. तिने मॉडल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. कयादू २०२१ साली एवरी यूथ फ्रेश फेस सीझन १२ जिंकली होती. त्याचवर्षी कयादूने कन्नड सिनेमा 'मुगिलपेट'मध्ये अभिनेत्रीच्या रुपात इंड्रस्ट्रीत एन्ट्री मारली.

kayadu lohar
Chhatrapati Shivaji Maharaj : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; काय आहेत प्रमुख वैशिष्ट्ये? वाचा

तेलुगु सिनेमा 'अल्लुरी'मध्ये अभिनेता श्री विष्णूसोबतही कयादूने काम केलं आहे. मात्र, 'अल्लूरी' सिनेमा बॉक्सऑफिसवर फार काही टिकला नाही. या सिनेमाने तिला ओळखही मिळवून दिली नाही. मात्र, तामिळ सिनेमा 'ड्रॅगन' सिनेमात काम केल्यानंतर कयादू चर्चेत आली. कयादू आता लाखो तरुणांची ड्रीम गर्ल झाली आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिला सोशल मीडियावर २.५ मिलियन म्हणजे २५ लाख यूजर्स फॉल करत आहे. कयादू नेहमी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंवरही चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com