
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून दुखद वार्ता हाती आली आहे. दिग्गज क्रिकेटपटू बॉब काउपर यांचं ११ मे रोजी मेलबर्नमध्ये निधन झालं. बॉब यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉब काउपर यांच्या निधनाच्या वृत्तेला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दुजोरा दिला आहे. काउपर गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. काउपर यांच्या पश्चात पत्नी डेल आणि दोन मुली ओलिविया आणि सेरा असा त्यांचा परिवार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमॅन माइक बेयर्ड यांनी म्हटलं की, 'बॉब काउपर यांच्या निधनाच्या वृत्ताने दु:ख झालं. ते ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील सन्मानीय सदस्य होते. बॉब एक चांगले फलंदाज होते. त्यांची मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये त्रिशतक ठोकण्यासहित १९६० साली ऑस्ट्रेलिया आणि विक्टोरिया (राज्य) या दोन्ही संघासाठी केलेली चांगली कामगिरी कायम लक्षात राहील'.
डावखुरे फलंदाज बॉब काउपर हे स्ट्रोकप्ले आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखले जायचे. काउपर यांनी सर्वात शानदार खेळी फेब्रवारी १९६६ साली मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडच्या विरोधात खेळली होती. त्यांनी १२ तासांत मॅरेथॉन डावात ५८९ चेंडूत ३०३७ धावा कुटल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर बॉब यांनी पहिलं त्रिशतक ठोकलं. २० व्या शतकात ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर टेस्ट क्रिकेटमधील एकमेव त्रिशतक आहे.
बॉब यांनी कॅरिबियन जमिनीवर दोन शतक ठोकले आहेत. त्रिशतक ठोकल्यानंतर बॉब यांनी दोन शतक ठोकले होते. त्यानंतर त्यांनी अचानक १९६८ साली निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी फक्त ते २८ वर्षांचे होते. काउपर यांनी १९६४ ते १९६८ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी २७ टेस्ट सामने खेळले. त्यांनी ४६.८४ टक्क्यांच्या सरासरीने २०६१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ शतक आणि १० अर्धशतक ठोकले.
घरच्या मैदानावर काउपर यांनी विक्रमी खेळी खेळली आहे. त्यांनी ७५.७८ टक्क्यांच्या सरासरीने टेस्ट क्रिकेटमध्ये १०६१ धावा कुटल्या आहेत. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर काउपर घरच्या मैदानावर चांगली फलंदाजी करायचे. ते ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करायचे. त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये ३६ गडी बाद केले होते.
काउपर यांनी १४७ फर्स्ट क्लास सामन्यांध्ये १०५९५ आणि ४ लिस्ट ए सामन्यांमध्ये ७७ धावा केल्या आहेत. फर्स्ट क्लासमध्ये काउपर यांच्या नावावर १८३ आणि लिस्ट ए मध्ये ३ गडी घेतल्याची नोंद आहे. ते आयसीसी सामन्यांमध्ये पंच देखील राहिले आहेत. काउपर यांना २०२३ साली क्रिकेटसाठी त्यांना 'मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' म्हणून घोषित करण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.