
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये भारताने स्थान मिळवले आहे. २०१३, २०१७ आणि २०२५ असे तिसऱ्यांदा टीम इंडियाने फायनल गाठली आहे.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ६५ धावा करायच्या आहेत.
विराट आयसीसी स्पर्धेतील नॉकआऊटमध्ये १००० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
विराट कोहली आणि अक्षर पटेलची जोडी जमली होती. पण अक्षर पटेल २८ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
विराट कोहली खंबीरपणे उभा असल्यामुळे भारतीय संघाने १५० धवा पूर्ण केल्या आहेत.
टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे. ४५ धावांवर श्रेयस अय्यर बाद झाला. श्रेयसच्या जागी अक्षर पटेल मैदानात उतरला आहे.
भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा पायचित होऊन माघारी परतला आहे.
भारताला पहिला मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिल ८ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
कॅरीने ४८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात बाद करत माघारी धाडलं आहे.
स्टीव्ह स्मिथने एक बाजू धरुन ठेवली होती. मात्र शमीने त्याला बाद करत माघारी धाडलं.
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला आहे. मार्नस लाबुशेन तंबूत परतला आहे.
ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला २ धक्के बसले, पण ऑस्ट्रेलियाच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचे १३ ओव्हर्स पूर्ण झाले असून २ विकेट्स गमावून कांगारूंनी ७२ रन्स केले आहेत. सध्या लाबुशेन आणि कर्णधार स्मिथ क्रिझवर आहेत.
ट्रेविस हेडची विकेट काढण्यात अखेर टीम इंडियाला यश मिळालं आहे. वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर हेड कॅच आऊट झाला.
मोहम्मद शमीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शमीने स्वतः हेडचा कॅच सोडला. त्यावेळी हेडने एकही रन केला नव्हता
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला असून ओपनर कॉनली शून्यावर बाद झाला आहे.
भारताकडून पहिल्या दोन ओव्हर पूर्ण झाल्या असून एक ओव्ह शमी आणि एक ओव्हर पंड्याने फेकली. यामध्ये ऑस्ट्रेलियाला केवळ ३ रन्स करता आले.
हेड विरूद्ध पंड्या यांच्यामध्ये पंड्याचं पारडं नेहमी जड असल्याचं दिसून आलं आहे. ३ इनिंगमध्ये २ वेळा पंड्याने हेडची विकेट घेतली आहे
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली असून हेड आणि कॉलीन क्रिझवर आहेत
न्यूझीलंडविरूद्ध ज्या खेळाडूंना टीममध्ये संधी देण्यात आली होती, त्याच खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकला असून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. १९९८ पासून टीम इंडिया कधीही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये हरलेली नाही.
भारतीय फलंदाज विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीचा सलग तिसरी सेमीफायनल आज खेळणार आहे. २०१३ मध्ये, कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये नाबाद ५८ रन्स केले होते. तर २०१७ मध्ये अर्धशतकी खेळी केलेली. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीची बॅट काय धुमाकूळ घालणार हे पाहावं लागणार आहे
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आयसीसीचा चौथा उपांत्य सामना खेळणार आहे.
टीम इंडियाने दुबईतील एकदिवसीय सामन्यांमध्ये अबाधित राखले आहे. त्यांनी 9 पैकी 8 सामने जिंकले असून 1 सामना टाय झाला आहे, दुबईत एकही पराभव समोर आलेला नाही.
ऑस्ट्रेलियन टीम आतापर्यंत पाकिस्तानमध्ये होती आणि काही दिवसांपूर्वीच दुबईला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, त्यांना इथल्या परिस्थितीशी लवकर जुळवून घ्यावं लागलं. दरम्यान मॅथ्यू शॉर्टला पायाच्या दुखापतीमुळे टीमबाहेर ठेवण्यात आलं आहे. त्याच्या जागी युवा फिरकी गोलंदाज अष्टपैलू कूपर कॉनोलीचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताने अजून एकही सामना गमावलेला नाही. या स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने चांगल्या निकालांसह जिंकले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिली सेमीफायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना नवीन खेळपट्टीवर खेळवला जाईल, जी यापूर्वी कोणत्याही सामन्यात वापरली गेली नाही.
आयसीसीच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे टॉप-२ संघ आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत २५ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध आतापर्यंत सर्व फॉरमॅटमध्ये खेळलेल्या २५ सामन्यांपैकी भारतीय संघाने ११ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे, तर ऑस्ट्रेलियन संघाने १३ वेळा विजय मिळवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.