Saif Ali Khan: 'आमच्या भूमीवर...';१८ दिवसांनंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सैफ अली खानची प्रतिक्रिया, म्हणाला, लोकांचा नरसंहार...

Saif Ali Khan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हल्ल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र, अभिनेता सैफ अली खानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
Saif Ali Khan
Saif Ali KhanSaam Tv
Published On

Saif Ali Khan: २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र, अभिनेता सैफ अली खानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, ज्यामुळे काही लोकांनी त्याच्यावर टीका केली होती.

अखेर, हल्ल्यानंतर १८ दिवसांनी सैफ अली खानने मौन सोडत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने म्हटले, "मी पहलगाममध्ये निर्दोष लोकांच्या हत्येवर माझ्या सरकारच्या प्रतिक्रियेच्या पूर्ण समर्थनात उभा आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसोबत आहेत. मी आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करतो आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे आभार मानतो. आपण सर्वांनी दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहूयात, जय जवान, जय हिंद."

Saif Ali Khan
Salman Khan: भारत-पाक युद्धबंदीवर 'हे' काय बोलला सलमान खान; अभिनेत्याच्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर गोंधळ!

सैफच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे. त्याच्या पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरनेही यापूर्वी या हल्ल्यावर दुःख व्यक्त केले होते. तिने इंस्टाग्रामवर लिहिले होते, "पीडित आणि त्यांच्या कुटुंबांसाठी हृदयविदारक आहे. पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे."

Saif Ali Khan
Bhool Chuk Maaf: राजकुमार रावचा 'भूल चुक माफ' थिएटरनंतर आता ओटीटीवरही होणार नाही प्रदर्शित; हाय कोर्टाने घेतला कठोर निर्णय

या हल्ल्यानंतर भारत सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्यित हल्ले केले. या कारवाईचे अनेकांनी समर्थन केले असून, सैफ अली खाननेही आपल्या प्रतिक्रियेत भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com