india pakistan conflict : पाकिस्तानात सत्तापालट होणार? ट्रम्प यांची मध्यस्थी, पाकने धुडकावली, वाचा स्पेशल रिपोर्ट

india pakistan ceasefire : भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली खरी पण पाकिस्तानमध्ये तख्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जातेय... त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
india pakistan conflict
india pakistan ceasefire Saam tv
Published On

भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यांनी घायाळ झालेल्या पाकिस्तान सरकारने अमेरिकेचं दार ठोठावलं.. भारताचे हल्ले थांबवण्यासाठी अमेरिकेला मध्यस्थीची विनंती केली.. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली.. मात्र पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा निर्णय लष्कर प्रमुख असीम मुनीरने अवघ्या तीन तासात धुडकावून लावत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.... आता पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुख असीम मुनीर विरुद्ध पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात संघर्षाची ठिणगी पडलीय...त्याची कारणं काय आहेत? पाहूयात...

लष्कराविरोधातील असंतोषामुळेच पाकची युद्धखोरी

युद्धखोरीला भारतानं सडेतोड उत्तर दिल्यानं पाकची नाचक्की

फतेह-1 मिसाईल भारतानं पाडल्यानं पाकचं हसू झालं

भारतावरच्या हल्ल्यात विशेष काही हाती न लागल्यानं मुनीरचा संताप

शरीफ सरकारकडून अमेरिकेच्या मध्यस्थीचं स्वागत, मुनीरच्या लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

एकीकडे पाकमध्ये महागाई, बेरोजगारी शिखरावर आहे... त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सरकार आणि लष्कराविरोधात असंतोष आहे.. तर इम्रान खान यांच्या पक्षाचे 93 खासदार असतानाही त्यांना तुरुंगात टाकण्यात आलंय..त्यामुळे इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेत... तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान युद्धात प्रत्येक वेळी सपाटून मार खावा लागल्याने युद्धानंतर पाकिस्तानमध्ये तख्तापालट होण्याचा इतिहास आहे...

india pakistan conflict
Operation Sindoor : १०० दहशतवाद्यांचा खात्मा, ९ दहशतवादी तळांवर हल्ला, कसाबचं ट्रेनिंग कॅम्प उद्धवस्त; सैन्य दलाकडून A टू Z माहिती, वाचा

1949

पहिल्या भारत-पाक युद्धानंतर पाकवर लष्करी प्रभाव वाढला

1969

1965 युद्धातील पराभवाने निर्माण झालेल्या असंतोषामुळेच आयुब खानचा राजीनामा

1971

बांग्लादेशच्या निर्मितीनंतर याह्या खानचं सरकार उलथवून भुट्टो पंतप्रधान

1999

कारगिलमधील पराभवानंतर परवेझ मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांचं सरकार उलथवलं

india pakistan conflict
india pakistan tensions : शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं प्रत्युत्तर; हवाई दलाचा पाकला इशारा, सीमेवर नेमकं काय घडलं?

पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली यादवी, लष्करावरील संपत चाललेला विश्वास, बलुचिस्तानमध्ये पडलेली विद्रोहाची ठिणगी यानंतर आता पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरनं मोठा दणका दिलाय.. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये पुन्हा तख्तापालट होऊन असीम मुनीरच्या नेतृत्वात लष्करानं बंड केल्यास शाहबाज शरीफ यांची सत्ता उलथून पडल्याशिवाय राहणार नाही... त्यामुळे पाकमध्ये हा विद्रोह किती टोकाला जातोय? त्यावर पाकिस्तानचं भवितव्य अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com