Kalyan News: उल्हास नदीत पोहताना तरुण बुडाला, वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही बुडाला; अग्निशमन दलाकडून शोध सुरु

2 Children Drowned In Ulhas River : पोहण्यासाठी नदीत उतरलेला तरुण बुडू लागल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा तरुणही बुडाला.
Kalyan Ulhas River
Kalyan Ulhas River Saam Tv
Published On

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Latest News: कल्याणमध्ये उल्हास नदीमध्ये (Ulhas River) दोन तरुण बुडाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणच्या (Kalyan) मोहनेजवळ ही घटना घडली आहे. पोहण्यासाठी नदीत उतरलेला तरुण बुडू लागल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा तरुणही बुडाला आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत हे तरुण वाहून गेले. अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध सुरु आहे.

Kalyan Ulhas River
Gujarat Accident News: गुजरातमध्ये भीषण अपघात, २ ट्रक समोरासमोर धडकले; १० जणांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील मोहने परिसरातील उल्हास नदीवर दोघे तरुण कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेले होते. यामधील एक तरुण नदीत पोहण्यासाठी उतरला. तो बुडू लागल्याने त्याला वाचविण्यासाठी दुसरा तरुण नदीत उतरला. मात्र पाण्याच्या प्रवाह असल्याने दोघेही नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

Kalyan Ulhas River
Sanjay Raut VS Narayan Rane : संजय राऊतांकडून नारायण राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण?

उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात राहणारे सलमान अन्सारी आणि सरफराज अन्सारी हे दोघे कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी उल्हास नदीवर गेले होते. हे दोघे नातेवाईक होते. सर्फराज हा उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहताच सलमानने नदीत उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे ही पाण्यात बुडाले.

Kalyan Ulhas River
Jaya Prada Punishment: अभिनेत्री जया प्रदा यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास; नेमकं काय आहे प्रकरण?

सलमान अन्सारी आणि सरफराज अन्सारी असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत. आज दुपारच्या सुमारस ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन विभाग आणि खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरू केले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने सध्या नदीत शोधकार्य सुरू आहेत. घटनास्थळावर मुलांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com