Jaya Prada Punishment: अभिनेत्री जया प्रदा यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास; नेमकं काय आहे प्रकरण?

Actress Jaya Prada : चेन्नई कोर्टाने अभिनेता जया प्रदाला सुनावली ६ महिन्याची शिक्षा.
Actress Jaya Prad
Actress Jaya PradInstagram/@ jayapradaofficial
Published On

Jaya Prada Jail: अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदाला चेन्नई कोर्टाने ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच अभिनेत्रीला ५००० रुपयांचे दंड देखील आकाराला आहे. चेन्नईतील रायपेटा येथील थिएटरमधील कर्मचाऱ्याने जया प्रदा यांच्या विरोधात याचिका केली होती.

चेन्नईतील हे थिएटर राम कुमार आणि राजा बेबी चालवतात. थिएटर कामगारांना ईएसआय देण्यास व्यवस्थापन अयशस्वी झाले तेव्हा कामकारणनी व्यायालयात धाव घेतली. अभिनेत्रीने कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले आणि याचिका फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली.

Actress Jaya Prad
HBD Suniel Shetty : सुनील शेट्टी ठरला सलमानसाठी देवदूत; गरीबीचे दिवस आठवून अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी

लेबर गव्हर्नमेंट इन्शोरन्स कॉर्पोरेशनच्या वकीललनी त्यांच्या या अपीलावर आक्षेप घेतला आणि आता जया प्रदासह आणिकही तीन ल्पकांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकाला ५००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जया प्रदा यांनी दोन वेळा लोकसभेत समाजवादी पार्टीकडून रामपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. २००४ आणि २००९साली काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत या जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यानंतर सपाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. (Celebrity)

Actress Jaya Prad
Gadar 2 : आनंद महिंद्राने तारा सिंगला अनोखी भेट देत दिल्या चित्रपटासाठी शुभेच्छा

रामपूरमधून खासदार झालेल्या जया प्रदा यांची राजकीय कारकीर्द 1994 मध्ये तेलुगू देसम पक्षातून सुरू झाली. जयाप्रदा 1996 मध्ये आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या.

यानंतर 2004 मध्ये त्या समाजवादी पक्षात सामील झाल्या आणि दोनदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यांनी राष्ट्रीय लोकदलाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com