प्रेमाला सीमा नसतात. प्रेमासाठी माणूस काहीही करु शकतो अशा आशयाचा सुपरहिट चित्रपट म्हणजे 'गदर एक प्रेम कथा'. २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. गदर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाचा सिक्वेल 'गदर २' चित्रपट आज ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली.
तारा सिंग आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील 'मै निकला गड्डी ले के' या गाण्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या गाण्यात सनी देओल आणि तारा सिंगची प्रेमकहाणी पाहायला मिळते.
तारा सिंग आणि ट्रकचे अनोखे नाते चित्रपटात दाखवण्यात आले आहे. याच 'गदर २' चित्रपटासाठी उद्योजक आनंद महिंद्रानी तारा सिंगला एक सरप्राईज दिले. आनंद महिंद्रानी कंपनीच्या ट्रकच्या मदतीने गदर २ असे नाव लिहण्यात आले आहे. अशा अनोख्या पद्धतीने आनंद महिंद्रानी 'गदर २' चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
आनंद महिंद्रानी तारा सिंगला अनोख्या शुभेच्छा दिल्या. महिंद्रा कंपनीने ट्विटरवरुन गदर चित्रपटाला शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकच्या साहाय्याने 'गदर २' हे नाव तयार केले.
'व्हिडिओला 'गदर २' चित्रपटाला साजर करत असताना, मेगा स्टार सनी देओलच्या आयकॉनिक ट्रक ड्रायव्हरची रिएंट्री झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत'. अशा शुभेच्छा दिल्या.
या सरप्राईजसाठी सनी देओलने महिंद्रा ग्रुप आणि आनंद महिंद्राचे आभार मानले. यादरम्यान आनंद महिंद्रानी तारासिंगची आठवण सांगितली. 'तारासिंगला आपण कसे विसरणार',असे म्हणत सनी देओलचा शुभेच्छा दिल्या. महिंद्रा कंपनीने 'मै निकला गड्डी लेके' या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला . याद्वारे महिंद्रा कंपनीने महिंद्रा ट्रकचे प्रमोशनही केले.
'गदर' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा गदर २ लाही प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील असं मत तज्ज्ञांचे मत आहे. आज गदर २ चित्रपटासोबतच 'ओह माय गॉड २' चित्रपटही रिलीज झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.