Sanjay Raut VS Narayan Rane : संजय राऊतांकडून नारायण राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल, काय आहे प्रकरण?

Sanjay Raut News : मी कोर्टात माझा जबाब दिलेला आहे. त्यांनी कोणाशी सेटिंग लावली ते सांगावं लागेल.
Sanjay Raut vs Narayan Rane
Sanjay Raut vs Narayan RaneSaam TV
Published On

जयश्री मोरे

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार  संजय राऊत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड कोर्टात गेले आहेत. सेटिंग करून संजय राऊत यांचं नाव मतदान यादीत टाकलं असं नारायण राणे बोलले होते. याच वक्तव्यावरुन नारायण राणेंच्या विरोधात संजय राऊत यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, नारायण राणे यांच्या विरोधात मी कोर्टात आलो आहे. 15 जानेवारी 2023 रोजी त्यांनी भांडूप येथील सभेत माझ्या विरोधात भाष्य केलं होतं. संजय राऊतांना मी खासदार बनवलं असं त्यांनी सांगितलं.

माझ्याकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती,. माझं मतदार यादीत नाव नाही हे असं कसं बोलतात. त्यांनी सेटिंग करून माझं नाव मतदान यादीत टाकलं असं बोलत आहेत. (Latest marathi News)

Sanjay Raut vs Narayan Rane
Shivsena Podcast Sanjay Raut: 'शिवसेना तोडणं म्हणजे...'; संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मी कोर्टात माझा जबाब दिलेला आहे. त्यांनी कोणाशी सेटिंग लावली ते सांगावं लागेल. त्यांनी सांगितलं नाही तर त्यांची खासदारकी धोक्यात आहेत. त्यांना आता उत्तर द्यावं लागेल. मी मानहानीचा खटला दाखल केला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

तुम्हाला जसं मुख्यमंत्री बनवलं तसं मला बाळासाहेब ठाकरेंनी खासदार बनवलं आहे. तुम्ही तेव्हा सेटिंग लावली आता तुमचे पुरावे तुम्ही सेटिंग लावून आणा. कोर्टाने आम्हाला पुढील तारीख 29 सप्टेंबरला देण्यात आली आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली. (Political News)

Sanjay Raut vs Narayan Rane
Rahul Gandhi on PM Modi : मणिपूर जळतंय आणि PM मोदी लोकसभेत हसत होते, राहुल गांधींची पंतप्रधानांवर सडकून टीका

नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी विचारपूर्वक बोलायला हवं. दोन दिवसांपूर्वीही अविश्वास प्रस्तावादरम्यान त्यांची भाषा तुम्ही पाहा. केंद्रीय मंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही. तुम्ही गुंड असाल, पण सभागृहात नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com