Gujarat Accident News: गुजरातमध्ये भीषण अपघात, २ ट्रक समोरासमोर धडकले; १० जणांचा जागीच मृत्यू

Mini Truck And Truck Accident: दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Gujarat Accident News
Gujarat Accident NewsSaam Tv

Gujarat News: गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघाताची (Gujarat Accident) घटना समोर आली आहे. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बावळा-वडोदरा महामार्गावर (Bavla-Bagodara highway) हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Gujarat Accident News
Maharashtra Political News: मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा: नाना पटोले

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील बावला-बगोदरा महामार्गावर शुक्रवारी सकाळी एका मिनी ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.

अहमदाबादपासून सुमारे 50 किमी अंतरावर बावळा-बगोदरा महामार्गावर टायर पंक्चर झाल्यामुळे ट्रक उभा होता. त्याचवेळी या ट्रकला पाठिमागून येणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. या मिनी ट्रकचा वेग इतका होता की अपघातामध्ये या ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला. या मिनी ट्रकमधून 3 मुलांसह 20 जण प्रवास करत होते. हे सर्वजण दर्शन घेऊन परतत येत होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला.

Gujarat Accident News
Nawab Malik Bail: माजी मंत्री नवाब मलिकांना 'सर्वोच्च' दिलासा! मनी लाँड्रिंग प्रकरणात अखेर जामीन मंजूर

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना ट्रकमधून बाहेर काढून बगोदरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.

काही जणांना रस्त्याने जाणाऱ्या आणि स्थानिक लोकांनी कसेतरी टेम्पोतून बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच बगोदरा येथील रुग्णवाहिका आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी आणि मृतांना पोस्टमॉर्टमसाठी अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अपघातातील सर्व बळी कपडवंज तालुक्यातील सुंदा गावातील रहिवासी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com