मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत एक सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून नवाब मलिक तुरुंगात आहेत. (NCP leader Nawab Malik Interim Bail)
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या सात महिन्यांपासून अटकेत असलेले नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन त्यांना महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनी लाँर्डिंग प्रकरण (Money Laundering Case) तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व हस्तकाशी सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
याच प्रकरणात ईडीने नबाव मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. गेल्या सात महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यासाठी त्यांनी वारंवार कोर्टाला विनंती केली होती. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून प्रकृती ठीक नसल्याने जामीन देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे ईडीने (ED) म्हणले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना फेब्रूवारी २०२२ मध्ये नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. अजित पवार गटाच्या बंडानंतर नवाब मलिक यांच्या सुटकेच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.