Mumbai Crime News: महिलांशी गोड बोलायचा; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवायचा अन्... २२ महिलांचे शोषण करणाऱ्या नराधमाला अटक

Mumbai Latest News: आरोपी पीडित महिलांना भाऊ, वडील किंवा पतीचा मित्र म्हणून ओळख सांगायचा. त्यांच्याशी गोड बोलून विश्वास जिंकून गाडीवर लिफ्ट द्यायचा.
 Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv

Mumbai News: दुचाकीवरुन घरी सोडण्याच्या बहाण्याने २२ महिलांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बाळू खैरे असे या आरोपीचे नाव असून त्याने या वर्षी २२ महिलांचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. (Crime News In Marathi)

 Mumbai Crime News
Pune Crime News: विभक्त राहणाऱ्या बायकोने चक्क नवऱ्याची दिली सुपारी; पण त्यानेच केला घात, नेमकं काय घडलं?

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन-कोळीवाडा भागातील रहिवासी बाळू पांडुरंग खैरे याला बुधवारी दिवा येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर तब्बल २२ महिलांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे. आरोपी पीडित महिलांना भाऊ, वडील किंवा पतीचा मित्र म्हणून ओळख सांगायचा. त्यांच्याशी गोड बोलून विश्वास जिंकत त्यांना कामाच्या ठिकाणी सोडण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवायचा आणि निर्जळस्थळी नेवून विनयभंग करायचा.

या प्रकरणाची एक तक्रार पोलिसांकडे आली होती. या महिलेने आपल्या तक्रारीत आरोपीने तिला घरी सोडण्यासाठी लिफ्ट देऊ केली आणि तिला वांद्रे (पूर्व) येथील एका इमारतीत नेवून तिचा विनयभंग केल्याचे सांगितले होते. पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर तो तिचा मोबाईल घेऊन पळून गेल्याचे सांगितले.

 Mumbai Crime News
Independence Day: 15 ऑगस्टला तुमच्या इथं कोणता नेता करणार ध्वजारोहण?, सरकारकडून यादी जाहीर; पाहा एका क्लिकवर

या तक्रारीची गंभीर दखल घेत निर्मलानगर पोलिसांनी (Nirmlanagar Police) आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. परिसरातील कॅमेऱ्यांची तपासणी करत आरोपीच्या गाडीचा क्रमांक मिळवून अखेर आठ तासांच्या प्रयत्नानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासात त्याने आत्तापर्यंत २२ महिलांचा विनयभंग केल्याची कबुली दिली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com