Palghar Accident : बोइसर-चिल्हार महामार्गावर भीषण अपघात; २८ वर्षीय डॉक्टर महिलेचा मृत्यू

Palghar accident woman doctor killed in truck collision : पालघर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. या अपघातात २८ वर्षीय डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला.
Palghar accident woman doctor killed in truck collision
Palghar accident woman doctor killed in truck collisionsaam tv
Published On

रुपेश पाटील, पालघर | साम टीव्ही

Palghar News : पालघर जिल्ह्यातील बोईसर-चिल्हार मार्गावर आज, शुक्रवारी भीषण अपघात झाला. खैरापाडा पुलाजवळ भरधाव ट्रकनं स्कुटीला धडक दिली. यात २८ वर्षीय डेंटिस्ट डॉक्टर कृष्णप्रभा यांचा जागीच मृत्यू झाला. त्या खैरापाडा येथील कृष्णानगर परिसरात राहत होत्या.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून डॉ. कृष्णप्रभा यांचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर ट्रकच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या अपघाताच्या घटनेचा तपास सुरू आहे. डॉक्टर तरुणीच्या मृत्यूमुळं परिसरावर शोककळा पसरली.

भुसावळमध्ये भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, आई-मुलगा गंभीर

संजय महाजन, जळगाव

भुसावळ तालुक्यातील वरणगाव रोडवरील कपिल वस्ती नगर परिसरात हिरा मारुती मंदिराजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घुसली आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकलवरील आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. या अपघाताचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Palghar accident woman doctor killed in truck collision
Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

अमरावतीत विटांनी भरलेला ट्रक पुलाखाली कोसळला, एकाचा मृत्यू

अमर घटारे, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात झाला. विटांनी भरलेला ट्रक पुलाखाली कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. परतवाडा–चांदूरबाजार मार्गावरील पेडी नदीवरील पुलावर हा अपघात झाला.

विटांनी भरलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुलावरील सुरक्षा कठडा तोडून अनियंत्रित झालेला ट्रक नदीपात्रात कोसळला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. पोलीस पथक, बचाव पथकाने जेसीबीच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले. या अपघातात जखमी झालेल्यांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Palghar accident woman doctor killed in truck collision
Accident Tragedy : ताम्हिणी घाटात थरार! अंधारात टॉयलेटला गेले, दरीचा अंदाज न आल्याने खोल दरीत कोसळले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com