Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याची धुरा कोण सांभाळणार? बड्या नेत्याने थेट नाव सांगितलं

Will Devendra Fadnavis join the Union Cabinet : देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला असून, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Will Devendra Fadnavis join the Union Cabinet :
Will Devendra Fadnavis join the Union Cabinet :
Published On

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis : केंद्र सरकारच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीस आता केंद्रात जाणार का? आणि ते गेले तर महाराष्ट्राची धुरा नक्की कोणाच्या हाती असणार? यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याची धुरा कोण सांभाळणार?

सध्या भाजपमध्ये अनेकांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत आहे. त्या शर्यतीत अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही आहेत. आता नरेंद्र मोदींना बाजूला सारण्याची हालचाल सुरू आहे. अमित शाह यांनी प्रादेशिक पक्षांमध्ये खूप मोठी राजकीय गुंतवणूक करून भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'देवेंद्र फडणवीसांना खिशात ठेवायचे, शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद द्यायचे आणि अमित शाह स्वत: पंतप्रधान होणार असतील तरच त्यांना मदत करायची' अशी कुटनीती सध्या सुरू आहे. असा हर्षवर्धन सपकाळ म्हणाले."

Will Devendra Fadnavis join the Union Cabinet :
Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर; शित्रणमंत्रालयाची सूत्रे आता या दिग्गज नेत्याकडे

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना; काय कारण असावे?

"धर्मेंद्र प्रधान यांचे काम म्हणजे आपल्या मर्जीतील लोकांना एकत्र करून परीक्षांचे आयोजन करणे आणि प्रायव्हेट क्लासेसच्या माध्यमातून प्रचंड पैसे घेऊन पेपर्स पोहचवणे हेच होते. आता त्यांचा पर्दाफाश झाल्यामुळे त्यांची जागा घेणारा असाच एखादा माणूस भाजपला हवा आहे. भाजप आणि संघाचा अजेंडा पुढे घेऊन जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा योग्य पर्याय दुसरा असूच शकत नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी जे केले, त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचे काम फडणवीस करू शकतात, म्हणूनच त्यांची केंद्रात निवड होण्याची दाट शक्यता आहे, असा दावा सपकाळ यांनी साम टीव्हीशी बोलताना केला."

Will Devendra Fadnavis join the Union Cabinet :
Shiv Sena : बड्या नेत्याचा अपघाती मृत्यू, शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर आरोप, महाराष्ट्रात खळबळ

मोदींना हटवण्यासाठी संघर्ष सुरू आहे का?

"त्यासाठी आम्ही कोणत्याही हिंसक किंवा चुकीच्या मार्गाचा अवलंब करणार नाही. आम्ही संविधानाने दिलेल्या संसदीय मार्गानीच पुढे जाऊ. राहुल गांधींनी अगदी स्पष्ट संदेश दिला आहे की 'नरेंद्र मोदी हा आता भूतकाळ आहेत, तर आजची तरुणाई हे देशाचे भविष्य आहे, असे सपकाळ म्हणाले.'"

Will Devendra Fadnavis join the Union Cabinet :
Arrested : राजकारणात मोठी खळबळ! 'त्या' पक्षाच्या प्रमुखाला मध्यरात्री अटक; 'हे' ठरलं कारण

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर काँग्रेसची भूमिका काय?

"राहुल गांधी गेल्या ८ ते १० वर्षांपासून NEET परीक्षेतील गैरप्रकार आणि त्यामागे कार्यरत असलेल्या रॅकेटच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. NEET परीक्षेचा हब मानल्या जाणाऱ्या कोटा (राजस्थान) येथे जाऊन राहुल गांधींनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या गैरप्रकारांविरोधात संसदेत ताकदीने आवाज उठवून कठोर कायदा करू आणि या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करू, हीच राहुल गांधी आणि काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे, असे सपकाळ यांनी सांगितले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com