Shiv Sena : बड्या नेत्याचा अपघाती मृत्यू, शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर आरोप, महाराष्ट्रात खळबळ

Akola Shiv Sena leader death : अकोल्यात शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्यूला संशयाचे गालबोट लागले आहे. कुटुंबीयांचा पक्षाच्या माजी जिल्हाप्रमुखावरच हत्येच्या कटाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Akola Shiv Sena leader death
Akola Shiv Sena leader deathSaam TV Marathi
Published On

अक्षय शिंदे, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Akola Shiv Sena leader death : अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणाने अकोल्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यात थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावरच हत्येच्या कटाचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केलाय. मंगेश काळे यांच्या अटकेसाठी रात्री खदान पोलीस स्टेशनमध्ये मृतकाच्या कुटुंबीयांनी धडक दिलीय.

२३ जुलै रोजी संध्याकाळी अकोल्यातील नेहरूपार्क परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या दुचाकीला मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होतीय. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोहसीन यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र, हा अपघात नसून सुनियोजित घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. विशेष म्हणजे, शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीच वाहनाने धडक देत मोहसीन यांची हत्या केल्याचा थेट आरोप कुटुंबीयांनी केलाये.

Akola Shiv Sena leader death
महाराष्ट्र हादरला! शिंदेसेनेच्या २ नगरसेवकांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, ४ जखमी, १६ जणांवर हत्येचा गुन्हा

या आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळालेय. या प्रकरणात त्यांनी माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर थेट आरोप करत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. मंगेश काळे हे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख असून माजी नगरसेवक आहेय. सध्या त्यांच्या पत्नी सुरेखा काळे या महापालिकेत नगरसेविका आहेत. घटनेनंतर संतप्त नातेवाईक, समर्थक आणि नागरिकांनी खदान पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत निष्पक्ष तपासाची मागणी केली. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

Akola Shiv Sena leader death
BJP worker shot : भरदिवसा थरार! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; महाराष्ट्र हादरला

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलेयेत. हा अपघात होता की पूर्वनियोजित घातपात, याचा उलगडा तपासानंतरच होणारेय. सध्या या प्रकरणातील आरोप हे कुटुंबीयांकडून करण्यात आलेले असून, त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाहीय. त्यामुळे तपासाच्या निष्कर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com