Arrested : राजकारणात मोठी खळबळ! 'त्या' पक्षाच्या प्रमुखाला मध्यरात्री अटक; 'हे' ठरलं कारण

Tej Pratap Yadav Arrested : बिहार बंद आंदोलनादरम्यान आंदोलकांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांना पाटण्यात अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Tej Pratap Yadav Arrest
Tej Pratap Yadav ArrestSaam TV
Published On

Tej Pratap Yadav Arrest : बिहारच्या राजकारणात मध्यरात्री एकच मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव यांना पोलिसांनी अचानक मध्यरात्री सिटी सेंटर मॉलजवळ ताब्यात घेत अटक केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तेज प्रताप यादव यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. नक्की कोणत्या प्रकरणात ही कारवाई झाली, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जनशक्ती जनता दल (जेजेडी) प्रमुख तेज प्रताप यादव यांना शनिवारी (२५ जुलै) रात्री उशिरा पाटणा येथे पोलिसांनी अटक केली. पाटण्यातील आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आणि भडकवल्याचा आरोप तेज प्रताप यादव यांच्यावर आहे. शनिवारी बिहार बंददरम्यान पाटण्यातील एका आंदोलनात माजी मंत्री सहभागी झाले होते, जिथे हिंसक निदर्शने उसळली होती. त्या प्रकरणात तेज प्रताप यादव यांना अटक करण्यात आली आहे.

Tej Pratap Yadav Arrest
Shiv Sena : बड्या नेत्याचा अपघाती मृत्यू, शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर आरोप, महाराष्ट्रात खळबळ

मी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी माझा जीवही देईन

याआधी तेज प्रताप यादव पाटण्यातील रामगुलाम चौकात धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये सामील झाले. त्यानंतर लगेचच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जबरदस्तीने एका वाहनात बसवले. वाहनाचा दरवाजा धरून घेऊन जात असताना यादव म्हणाले, "आम्ही विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. गरज पडल्यास, मी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी माझ्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहे."

Tej Pratap Yadav Arrest
Uddhav Thackeray : 'गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!'; उद्धव ठाकरेंचा थेट निशाणा

दगडफेकीचा आरोप

आंदोलकांवर पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. पोलिसांची वाहने उलटवण्यात आली आणि प्रचंड गोंधळ उडाला. पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटना AISA आणि RYA यांनी आज बिहार बंदची हाक दिली होती. आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आणि भडकवल्याचा आरोप तेज प्रताप यादव यांच्यावर आहे, त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. दंडाधिकाऱ्यांनी तेजप्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तेज प्रताप यादव यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तुरुंगवास होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com