Uddhav Thackeray : 'गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!'; उद्धव ठाकरेंचा थेट निशाणा

Amit Shah resignation : सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत कायदा-सुव्यवस्था, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
Uddhav Thackeray demands Amit Shah resignation
Uddhav Thackeray demands Amit Shah resignationSaam TV
Published On

Uddhav Thackeray demands Amit Shah resignation : देशातील कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सध्या देशाची झालेली अवस्था पाहता, गृहमंत्र्यांनी आपल्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा," अशी रोखठोक मागणी उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, "फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन केंद्र सरकारला आपल्या अपयशावर पडदा टाकता येणार नाही. देशात ज्या प्रकारे सुडाचे राजकारण आणि सुरक्षेचा खेळखंडोबा सुरू आहे, त्याला थेट गृह मंत्रालय जबाबदार आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनीच आता पद सोडले पाहिजे."

Uddhav Thackeray demands Amit Shah resignation
Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर; शित्रणमंत्रालयाची सूत्रे आता या दिग्गज नेत्याकडे

"जनता हाच देवाचा खरा अवतार"

या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या अहंकारावरही ताशेरे ओढले. "लोकशाहीत जनता हीच खरी जनार्दन असून तीच भगवान विष्णूचा खरा अवतार आहे. जनतेला गृहीत धरणाऱ्या आणि हुकूमशाही वृत्तीने कारभार करणाऱ्यांना हीच जनता योग्य वेळी धडा शिकवेल," असा इशाराही त्यांनी दिला.

Uddhav Thackeray demands Amit Shah resignation
Shiv Sena : बड्या नेत्याचा अपघाती मृत्यू, शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर आरोप, महाराष्ट्रात खळबळ

मुलींवर लाठीचार्ज करणाऱ्यांचे सरकार!

यावर तीव्र संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "आपल्याच हक्कांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप मुलींवर आणि विद्यार्थ्यांवर निर्दयपणे लाठीचार्ज केला जातो, ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्या देशात आपल्याच लेकींवर काठ्या चालवल्या जातात, तिथले गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही हक्क उरत नाही. सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी तरुण-तरुणींच्या आवाजाचा गळा घोटत असून, या अत्याचाराचा जाब जनताच या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com