WhatsApp Message: तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोण वाचतंय... कुणाची आहे नजर? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

WhatsApp Chat Privacy: तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कुणीतरी वाचतंय...? कुणीतरी गुपचूप मेसेज वाचत असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक जण चिंतेत आले आहेत. या मेसेजमागचं सत्य काय आहे ते घ्या जाणून...
WhatsApp Message: तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोण वाचतंय... कुणाची आहे नजर? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Whatsapp chatSaam Tv
Published On

संदीप चव्हाण, साम टीव्ही

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुमचे चॅट कुणीतरी वाचतंय. हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बरेच लोकं व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी यामधून काय सत्य समोर आलं ते आपण पाहणार आहोत...

तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज कुणीतरी वाचतंय...? कुणीतरी गुपचूप मेसेज वाचत असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे तुम्ही लिहिलेला मेसेज कोण वाचतंय...? याचा शोध घेणं गरजेचं आहे.मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? एवढं धाडस कुणाचं होतंय की तो तुमचा मेसेज चोरून वाचतोय. याचा शोध घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने प्रयत्न केला आहे.

WhatsApp Message: तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोण वाचतंय... कुणाची आहे नजर? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
New Year 2025 : तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीतून द्या नववर्षाच्या खास शुभेच्छा; पाहा ट्रेंडी Whatsapp Messages

या व्हायरल मेसेजमुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण, देशात फोन असलेले जवळपास 80 टक्के लोकं व्हॉट्सअॅप वापरतात. अनेक लोक चॅटिंग करतात. काहींचे पर्सनल चॅट असतात, मात्र तेही कुणी वाचले तर अनेक वाद निर्माण होऊ शकतात. तसंच गुन्हेगारीही वाढू शकते. मात्र, हे खरं आहे का...? असं शक्य आहे का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय हे आपण जाणून घेणार आहोत.

WhatsApp Message: तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोण वाचतंय... कुणाची आहे नजर? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
WhatsApp: तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक झाले आहे का? तपासण्यासाठी वापरा हे ट्रिक्स

तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज, कॉलचा रेकॉर्ड सहज उपलब्ध होतोय. सरकारने त्यासाठी नवीन नियम लागू केलेत.त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज वाचता येतात. या मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र, सरकारने असे कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत. सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल केले जातायत. लोकांना घाबरवण्यासाठी अनेकजण काहीना काही चुकीचे मेसेज त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

WhatsApp Message: तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोण वाचतंय... कुणाची आहे नजर? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Whatsapp युजर्सला मोठा धक्का, 'या' स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप होणार बंद

साम टीव्हीने केलेल्या पडताळणीनुसार, तुमचे मेसेज कुणीही सहज वाचू शकत नाही. सरकारने असे नवीन नियम बनवलेले नाहीत. सरकार तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचत नाही. चुकीचा मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जात आहे. असे मेसेज कुणालाही वाचता येत नाही. काहीच गुन्हा झाला आणि कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटची माहिती हवी असल्यास पोलिसांमार्फत मिळवली जाते. त्यामुळे आमच्या पडताळणीत तुमचे मेसेज कुणीतरी वाचतंय हा दावा असत्य ठरलाय.

WhatsApp Message: तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट कोण वाचतंय... कुणाची आहे नजर? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर; व्हिडीओ कॉल करणं आता झालं अधिक सोपं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com