
स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाखो अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. आता काही फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. मेचा जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या अँड्रॉइट फोनला सपोर्ट करणे बंद होणार आहे. प्रत्येक वर्षी काही फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होतं. सुरक्षेच्या कारणांमुळे काही फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद केले जाते.(Whatsapp Will Ban In These Smartphone)
जर तुम्ही अँड्रॉइडचा KitKat व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला अडथळे येऊ शकतात. जवळपास १० वर्षांपूर्वीच व्हॉट्सअॅपने या व्हर्जनला सपोर्ट करणे बंद केले आहे. १ जानेवारी २०२५ नंतर KitKat व्हर्जन असलेल्या फोनमध्ये तुम्ही व्हॉट्सअॅप वापरु शकणार नाही. तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करावी लागणार आहे.
१ जानेवारीपासून या फोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद (Whatsapp Will Not support in these smartphone)
Samsung Galaxy S3, Galaxy Note 2, Galaxy Ace 3, Galaxy S4 Mini या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्याचसोबत HTC One X, One X+, Desire 500,Desire 601 मध्येही व्हॉस्टअॅप बंद होणार आहे. याचसोबत सोनी आणि एलजी कंपनीच्या काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होमार आहे. मोटोरोलाच्या Moto G, Razr HD, Moto E 2024 मध्ये व्हॉट्सअॅप वापरता येार नाही.
व्हॉट्सअॅपमध्ये नवीन नवीन फीचर्स वापरण्यासाठी फोन अपडेट करणे खूप गरजेचे असते. याचसोबत सिक्युरिची असणेदेखील गरजेचे असते. जुन्या व्हर्जनमध्ये तेवढी सिक्युरिटी नसते. त्यामुळे व्हॉट्सअॅपने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अनेक फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणे बंद करणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.