Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांचा एक फोन अन् कुटुंबियांना मिळाला चिमकुल्याचा मृतदेह

CM Devendra Fadnavis took action against hospital: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे कुटुंबीयांना मिळाला चिमुकल्याचा मृतदेह. तसंच मुख्यमंत्र्यांनी दिला कुटुंबियांना आधार.
Devendra Fadnavis
Devendra fadnavis Saam tv
Published On

चिमुकल्याच्या मृत्यूनंतर उर्वरित बिलासाठी मृतदेह न देण्याची संतापजनक भूमिका श्रीरामपूर येथील खासगी हॉस्पिटलनं घेतली होती. गरीब कुटुंबाकडे उर्वरित बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळं हॉस्पिटल प्रशासनानं मृतदेह पालकांना न देण्याची संतापजनक भूमिका घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकांचे सांत्वन करत कुटुंबाला आधार दिला.

श्रीरामपूर येथील वेद दर्शन सोमवंशी या तीन वर्षीय चिमुकल्याचा ब्रेन ट्युमरमुळे मृत्यू झाला होता. ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी त्याला अहिल्यानगर शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दुर्देवाने चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारासाठी पालकांनी २ हजार आधीच भरले होते. मात्र उर्वरित २ लाख ४५ हजार पालक भरू शकले नाहीत. ज्यामुळे हॉस्पिटल प्रशासनानं चिमुकल्याचा मृतदेह देण्यास नकार दिला.

Devendra Fadnavis
Devendra Fadanavis: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार, कुटुंबीयांना १० लाखांची मदत - मुख्यमंत्री

गरीब कुटुंबाकडे उर्वरित रक्कम भरण्यासाठी पैसे नव्हते. शिर्डी येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून कळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत रूग्णालयाला फोन लावला. हॉस्पिटल प्रशासनाला मृतदेह मुलाच्या नातेवाईकांना देण्याचे आदेश दिले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: कल्याणच्या घटनेचं सभागृहात पडसाद, मुजोर कर्मचाऱ्याचं तात्काळ निलंबन; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या या संवदेनशीलतेमुळे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. नंतर नरेश सुराणा यांनी त्यांच्या दुरध्वनीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी मृत मुलाच्या नातेवाईकांशी चर्चा केली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच मृत मुलाच्या पालकांना आधार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com