Athiya Shetty : 'मॉम टू बी' अथिया शेट्टीनं पहिल्यांदा फ्लाँट केला बेबी बंप, ऑस्ट्रेलियातला 'तो' व्हिडीओ व्हायरल

Athiya Shetty Spotted In Australia: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा बेबी बंप फ्लाँट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Athiya Shetty Spotted In Australia
Athiya Shetty SAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल हे अनेकांचे आवडते कपल आहे. अथिया आणि केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. यावर्षी त्यांना ही गोड बातमी देऊन चाहत्यांना आश्चयाचा धक्का दिला. हे दोघ नवीन वर्षात बाळाचे आगमन करणार आहेत. त्यामुळे अथियावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. सध्या अथियाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतीच अथिया शेट्टी बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. अथिया पहिल्यांदाच अशी मिडिया समोर बेबी बंप फ्लाँट करताना स्पॉट झाली आहे. हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातला (Australia) आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अथियासोबत अनुष्का शर्माही पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये अथिया अनुष्का शर्माच्या मागून चालताना दिसत आहे. अथियाने स्ट्रीप टॉप आणि डेनिम लाँग स्कर्ट परिधान केला आहे. हे दोघे स्टेडियममध्ये फिरताना दिसले आहेत.

सध्या ऑस्ट्रेलियात मॅच सुरू आहे. केएल राहुलने पहिल्या डावात २४ रन तर दुसऱ्या डावात तो शून्यवर आऊट झाला आहे. तो सध्या कसोटी सामना खेळण्यात व्यस्त आहे. नवऱ्याला चीअर अप करण्यासाठी अथिया स्टेडियमवर आली होती. अथिया शेट्टीने तेथे खूप वेळ अनुष्का शर्मासोबत घालवला. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीने अनेक काळ एकमेकांना डेट करत होते. जानेवारी 2023 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षानंतर हे दोघे आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. अथियाने 'हीरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अथिया शेट्टी सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अपडेट ती कायम चाहत्यांसोबत शेअर करते.

Athiya Shetty Spotted In Australia
Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरातून 'सारा अरफीन खान'चा पत्ता कट, बाहेर येताच केले मोठे खुलासे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com