Anushka Sharma : आर अश्विनच्या रिटायरमेंटवर अनुष्का शर्मा झाली भावूक, म्हणाली 'एक वारसा...'

Anushka Sharma Post : भारतीय क्रिकेटपटू आर अश्विनने गेल्या बुधवारी म्हणजेच १८ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अश्विनच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते खूप भावूक झाले आहेत.
anushka sharma and R.ashwin
anushka sharma and R.ashwinSaam TV
Published On

Anushka Sharma : भारतीय क्रिकेटर रविचंद्रन अश्विनने १८ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटपटूच्या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडे दुःखी आहे. आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये क्रिकेटर आणि त्याची पत्नी पृथ्वी अश्विनला टॅग केले आहे. अभिनेत्रीने भारतीय क्रिकेट ड्रेसिंग रूममधून अश्विनचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो शेवटच्या वेळी त्याच्या संघाला संबोधित करताना दिसत आहे.

अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक भावनिक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सर्व खेळाडूंना भेटले. या क्रिकेटरने काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंचीही भेट घेतली. आपल्या मित्रांना संबोधित करताना, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाचा निरोप घेताना दिसला, परंतु त्याच्या आत असलेला क्रिकेट चाहता नेहमीच सगळ्यांच्या सोबत असेल असे अश्विन म्हणाला .

anushka sharma and R.ashwin
Cocktail 2 : सैफ आणि दीपिकाच्या जागी शाहिद आणि क्रितीची रिप्लेसमेंट; १२ वर्षांनंतर बनणार चित्रपटाचा सिक्वेल

रविचंद्रन अश्विनचा हा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले की, 'नेहमी लक्षात राहील असा मौल्यवान क्रिकेटर'. यात अभिनेत्रीने अश्विनची पत्नी पृथ्वी अश्विनला देखील टॅग केले आहे.

anushka sharma and R.ashwin
Myra Vaikul : छोटी मायरा झळकणार 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटात

अनुष्का शर्माचे क्रिकेटर्ससोबत खास बॉन्डिंग

पती विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का अनेकदा भारतीय क्रिकेट संघासोबत दौऱ्यावर जाते. भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या पत्नींसोबत तिचे खूप चांगले संबंध आहेत. याआधीही अनुष्का क्रिकेटर्सच्या पत्नींसोबत मॅच दरम्यान स्टँडवर दिसली आहे. लंच आणि डिनर डेटवरही ती त्यांच्यासोबत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com