Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरातून 'सारा अरफीन खान'चा पत्ता कट, बाहेर येताच केले मोठे खुलासे

Sara Arfeen Khan : बिग बॉसचा गेम सध्या चर्चेत आहे. वीकेंडला बिग बॉसच्या घरातून 'सारा अरफीन खान' बाहेर पडली आहे. घराबाहेर पडताच सारा खानने घरातील सदस्यांविषयी मोठे खुलासे केले आहेत.
Sara Arfeen Khan
Bigg Boss 18SAAM TV
Published On

'बिग बॉस 18' चा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. बिग बॉसचा हा वीकेंड खूप खास ठरला. या वीकेंडला भाईजानचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एका सदस्याला बाहेर जावे लागले आहे. या सदस्याच्या घरा बाहेर जाण्यामुळे काही लोक भावुक झाले आहेत.

बिग बॉसच्या घरात तीन महिने गेम खेळल्यानंतर सारा अरफीन खान घराबाहेर गेली आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर मिडिया मुलाखतीत साराने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. साराने दिलेल्या माहितीनुसार, तिला करणवीर मेहराचा खूप राग येतो. कारण त्यांनी संपूर्ण प्रवासात तिला खूप चिडवले आहे. कशिशला सपोर्ट करताना संपूर्ण घर साराच्या विरोधात गेले.

साराने सांगितल्यानुसार, तिला घरात अविनाशपासून धोका होता. कारण तो नाती बनवतो आणि तोडतो. असे साराचे मत आहे. साराने घरातील सर्वात विश्वासू माणूस म्हणून रजत दलालचे नाव घेतले. त्याने साराला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली आहे. साराने रजतला 'बिग बॉस 18' चा विजेता घोषित केला आहे.

साराने करणवीर मेहरा दुटप्पी माणूस असल्याचे सांगितले हे. तो आतून एक आणि बाहेरून वेगळा वागतो. आता 'बिग बॉस' नवीन कोणते राडे होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच यंदा आठवड्यात टाइम गॉड कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. पुढच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आतापासून लागली आहे.

Sara Arfeen Khan
Baby John Collection : वरुण धवनचा 'बेबी जॉन' फ्लॉप? पाच दिवसांत सिनेमाने कमावले अवघे 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com